Latest News

श्रमदान करुन दुष्काळमुक्त होणार्‍या दोन हजार गावांना कठीण काम मशीनव्दारे करुन देण्याचा उपक्रम

वाशिम / महेंद्र महाजन जैन


भारतीय जैन संघटनेचा पुढाकार : जिल्हयातील 130 गावांचा समावेश
वाशीम – भारतीय जैन संघटना गेल्या 32 वर्षापासून नैसर्गीक आपत्ती क्षेत्रात देशभरात कार्यरत आहे. 2013 मध्ये बिड जिल्हयात 117 तलावातील 20 लाख क्युबिक मिटर गाळ काढून तो पाच हजार एकर जमीनीवर पसरविण्यात आला होता. 2015-16 मध्ये सुध्दा बिड, लातुर व उस्मानाबाद या जिल्हयात कामे करण्यात आली. महाराष्ट्रातील आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या 550 मुलामुलींचे शैक्षणिक पुनर्वसन पुणे येथे गेल्या 2 वर्षापासून करण्यात येत आहे. महाराष्ट्रात दुष्काळाची तिव्रता गेल्या 5 वर्षात सातत्याने वाढत चालली आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षापासून पाणी फाऊंडेशन वॉटरकप स्पर्धा सुरु केली आहे. यावर्षी या स्पर्धेत महाराष्ट्राच्या 13 जिल्हयातील 30 तालुक्याची निवड करण्यात आली आहे. सदर स्पर्धेत दोन हजार पेक्षा जास्त गावांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. महात्मा गांधींच्या स्वावलंबनाला साजेशे स्वातंत्र्य काळानंतरचे हे सर्वात मोठे काम आहे. असे बिजेएसचे मत असून या चांगल्या कार्याला मदत म्हणून या दोन हजार गावांना कठीण काम मशीनव्दारे देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा व राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पारेख यांनी दिली आहे. सदर योजनेत वाशीम जिल्हयातील कारंजा तालुक्यातील 130 गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. वॉटरकप स्पर्धेत गावकर्‍यांनी स्वत: या कार्यासाठी एकत्र यायचे, पाच लोकांना प्रशिक्षणाला पाठवायचे, आपल्या गावाचा वॉटरशेड मॅनेजमेंट प्लॉन आपणच तयार करायचा व श्रमदानाने करुन काम स्वावलंबी व्हायचे आहे. सदर कार्य हे परिवर्तनाची नांदी ठरणार आहे. प्रत्येक गावात भरपुर श्रमदान करण्यात येणार असून श्रमदानानंतर सुध्दा काही काम गावकर्‍यांना श्रमदानाने करता येणे शक्य नाही. कारण प्रत्येक गावात माथ्यापासून पायथ्यापर्यत काम करावे लागते. काही काम खडकात करावे लागणार असल्याने ते काम श्रमदानाने होणार नसल्याचे बिजेएसचा अनुभव आहे. त्यामुळे बिजेएसचे संस्थापक शांतीलाल मुथा यांनी राज्यस्तरावर कार्यकर्त्यांची बैठक घेवून श्रमदान करुन दुष्काळमुक्त होणार्‍या 2000 गावांना कठीण काम मशीनव्दारे करुन देण्याचा उपक्रम हाती घेण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष प्रङ्गुल्ल पारेख यांच्या नेतृत्वात सर्व जिल्हयात कार्यसमित्या व नियुक्त केलेल्या 50 तालुका सुपरवायझर कडून हे काम 400 पोकलॅन व 1200 जेसीबीच्या सहाय्याने एक महिन्यात पुर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दोन महिन्यात एकाच वेळी महाराष्ट्र राज्यातील दोन हजार गावांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कार्याचे नियोजन करुन ते यशस्वी करणे हे एक मोठे आव्हान आहे. मात्र गत 32 वर्षाचा अनुभव पाठीशी असल्याने हे काम जनतेच्या सहकार्याने व आशिर्वादाने नक्कीच पुर्ण करु असा विश्‍वास शांतीलाल मुथा यांनी व्यक्त केला आहे. गावकर्‍यांनी व जिल्हयातील दानशुरांनी या स्तुत्य उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केलेे.
——————————————————-

via Blogger http://ift.tt/2njhB7y




from WordPress http://ift.tt/2nju5f6
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.