राज्यात मंगळवारी झालेल्या पंचवीस जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने सर्वाधिक दहा अध्यक्षपदे जिंकून पहिला क्रमांक पटकावला आहे.
भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषद सदस्यांनी जळगाव, सांगली, कोल्हापूर, बुलढाणा, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, बीड व लातूर या नऊ जिल्ह्यांच्या जिल्हा परिषदांचे अध्यक्षपद जिंकले. सोलापूर येथे भाजपा पुरस्कृत आघाडीचा उमेदवार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवडून आला. भाजपा व मित्रपक्षांच्या उमेदवारांनी जळगाव, सोलापूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, बीड व लातूर या जिल्ह्यांच्या जिल्हा परिषदांची उपाध्यक्षपदे जिंकली. राज्यात झालेल्या २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांत एकूण सदस्य संख्येच्या बाबतीत भाजपाने पहिला नंबर पटकावला होता. पंचायत समिती सदस्यांच्या संख्येतही भाजपाच पहिल्या स्थानावर होता. नुकत्याच झालेल्या पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक सभापतीपदे जिंकली. जिल्हा परिषदांच्या सोबत राज्यात दहा महापालिकांच्या निवडणुका झाल्या होत्या. महापालिका निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत भाजपाने नगरसेवक संख्येच्या बाबतीत पहिला नंबर मिळविला होता. महापालिका, जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुकांपूर्वी राज्यात नोव्हेंबर – जानेवारी या कालावधीत झालेल्या २१० नगरपालिकांच्या निवडणुकीतही भाजपाने सर्वाधिक नगराध्यक्षपदे व सर्वाधिक नगरसेवकपदे जिंकून पहिले स्थान मिळविले होते.
via Blogger http://ift.tt/2mMpgtb
from WordPress http://ift.tt/2nOHcF1
via IFTTT
No comments:
Post a Comment