मुंबई –
हिंदूंना पैसे आणि इतर अनेक प्रलोभने दाखवून त्यांचे धर्मांतर केले जाते. यामुळे हिंदूंचे अस्तित्व धोक्यात आले आहे. हे न थांबल्यास हिंदू नामशेष होतील. आज धर्मांतरामुळेच हिंदूंची लोकसंख्या झपाट्याने घटत आहे. हिंदूंचे मोठ्या संख्येने होणारे धर्मांतर रोखायचे असेल, तर हिंदूंना संघटित व्हावे लागेल. धर्मांतरबंदी कायदा लागू करण्यासाठी हिंदूंनी एकत्रितपणे केंद्र शासनावर दबाव आणावा, असे प्रतिपादन श्री स्वामी समर्थ सेवा परिवाराचे श्री. संतोष पाताडे यांनी केले. हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी केंद्र शासनाने धर्मांतरबंदी कायदा करावा, या मागणीसाठी अंधेरी (पू.) रेल्वे स्थानकाबाहेर लेफ्टनंट सचिन मिरजकर चौक येथे १८ मार्चला राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
मागील मासात अंगारकी चतुर्थीच्या दिवशी सुरक्षेच्या कारणास्तव श्री सिद्धीविनायक मंदिरात श्रीफळ घेऊन जाण्यास शासनाने घातलेल्या बंदीच्या निर्णयाचा आंदोलनात विरोध करण्यात आला. श्री स्वामी समर्थ सेवा परिवार, औदुंबर दत्त समिती, हिंदु गोवंश रक्षा समिती, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आदी संघटनांचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनाच्या निमित्ताने राबवण्यात आलेल्या स्वाक्षरी चळवळीला लोकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. आंदोलनाच्या वेळी अनेक हिंदूंनी थांबून जिज्ञासेने विषय जाणून घेतला आणि स्वाक्षर्या नोंदवून शेकडो हिंदूंनी शासनाचा निषेध केला.
क्षणचित्र – आंदोलनातील विषय ऐकल्यावर प्रभावित होऊन काही युवक उत्स्फूर्तपणे आंदोलनात सहभागी झाले आणि आंदोलन संपेपर्यंत थांबले.
via Blogger http://ift.tt/2ncIwDO
from WordPress http://ift.tt/2mjRqQC
via IFTTT
No comments:
Post a Comment