Latest News

अचलपूरच्या निखीलची तहसिलदार म्हणुन निवड

श्री प्रमोद नैकेले /-अचलपूर:-

अचलपूर या ऐतिहासिक शहरा्ला शिक्षणाचा सुध्दा वारसा लाभलेला आहे हे निखील श्यामसुदंर धुळधर याने सिध्द केले आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या निकालात अचलपूरचा निखील श्यामसूदंर धुळधर याने तहसिलदारची परीक्षा उर्तीण केली असून तहसिलदार म्हणुन निवड झाली.निखीलचे माध्यमीक व उच्च माध्यमिक शिक्षण स्थानीक सिटी हायस्कूल येथे घेऊन व्ही.जे.टी.आय मुंबई येथून अभियांत्रिकीचे शिक्षण प्राप्त केले.इमरसन नेटवर्क पाँवर(मुबंई) येथे बड्या पगाराची नोकरी मिळाली असतांना ती सोडून राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली अवघ्या दोन वर्षाच्या अथक प्रयत्नाने तहसिलदारची परीक्षा उर्तीण करून तहसिलदार म्हणून त्याची निवड झाली.निखील आपल्या यशाचे श्रेय वडील श्यामसूदंर धुळधर जे चौसाळा येथे उपमुख्याध्यापक आहेत व आई मालतीताई ज्या सिटी हायस्कूल येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहे यांना व आपल्या मार्गदर्शक शिक्षक व मित्रांना देतो.निखीलच्या या यशाने अचलपूर परतवाडा शहराच्या नावलौकिकात मानाचा तुरा लागला असुन त्याचे कौतुक सर्वच स्तरातून होत आहे.हायस्कूल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा माधुरीताई देशमुख,सचिव दिपक देशमुख,जेष्ठ सदस्य हरदास सर,शाळेच्या मुख्याध्यापिका धानोरकरमँडम,उपमुख्याध्यापक सुनिल अंजनकर,पर्यवेक्षक पांडेसर व समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने त्यांचे कौतुक व अभिनंदन करुन पुढील यशस्वी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा दिल्या.

via Blogger http://ift.tt/2nmePAq




from WordPress http://ift.tt/2mPdYnD
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.