शहरातील लाखाळा परिसरात प्रवासी महिला व पुरुष नागरीकांसाठी बस थांबण्याच्या ठिकाणी प्रवाशी निवारा शेड उपलब्ध करुन देण्याची मागणी सावित्री महिला मंचच्या वतीने रविवार, 26 मार्च रोजी आमदार लखन मलीक यांना निवेदन देवून करण्यात आली.
लाखाळा परिसरात एस.एम.सी. स्कुल जवळ जाणार्या येणार्या परिवहन मंडळाच्या बसेस कित्येक वर्षापासून थांबत आहेत. याठिकाणी आधी बस थांबा असल्यामुळे प्रवाशी निवारा शेड उपलब्ध होता. व नागरीक बसची वाट पाहण्यासाठी या सुरक्षित शेडखाली थांबत होते. परंतु काही कालावधीनंतर हा निवारा पुर्णपणे उध्दवस्त झाला आहे. त्यामुळे प्रवाशांना उन्हातच ताटकळत उभे राहून बसची वाट पाहावी लागते. अशातच वृध्द नागरीक, अपंग व लहान बालकांना याचा खुप त्रास होत आहे. या सर्व बाबी पाहता आपल्या आमदार निधीतून प्रवाशांच्या सोईसाठी प्रवाशी निवारा शेड या जागी पुन्हा उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी सावित्री महिला मंचच्या वतीने आमदार लखन मलीक यांच्याकडे करण्यात आली. यावेळी निवेदन देतांना सावित्री महिला मंचच्या अध्यक्षा सौ. किरण समाधान गिर्हे, सचिव सौ. रेखा राऊत, सौ. पुजा उलेमाले, अल्का धामणकर, संगीता कांबळे, अनिता इंगोले, मिना बगाडे, गिताताई इंगोले आदींसह योगेश उलेमाले, समाधान गिर्हे, किसन काकडे, धनाजी सारसकर, पवन जोगदंड आदींची उपस्थिती होती. यावेळी आमदार लखन मलीक यांनी या निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद देवून लवकरात लवकर याठिकाणी प्रवाशी निवारा शेड उपलब्ध करुन देण्यात येईल असे आश्वासन दिले.
via Blogger http://ift.tt/2mE5xQS
from WordPress http://ift.tt/2ok0pOw
via IFTTT
No comments:
Post a Comment