Latest News

सक्षम विद्यार्थी घडतील असे अभ्यासक्रम तयार व्हावे- कुलगुरु डॉ. श्री मुरलीधर चांदेकर


    नवीन शिक्षण धोरण लवकरच येणार असून त्यासाठी राजकीय ते लोकोस्तरावरुन प्रयत्न सुरु आहेत.  शिक्षणक्षेत्रांतील बदल शेवटचा घटक असलेल्या विद्याथ्र्यांपर्यंत पोहोचवायचे आहेत.  प्राणीशास्त्र अभ्यासक्रमातील अद्ययावतीकरणावर आयोजित कार्यशाळेमुळे सक्षम विद्यार्थी घडतील असे विचार कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी मांडले.  प्राणीशास्त्र विभागाच्यावतीने अभ्यासक्रम अद्ययावतीकरणावर आयोजित एकदिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन करताना ते बोलत होते.  माजी विभागप्रमुख डॉ. आर.आर. धांडे, विज्ञान विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. एफ.सी. रघुवंशी, प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. सौ.सी.के. देशमुख व्यासपीठावर उपस्थित होते.
    कार्यशाळेचे उद्घाटन झाल्याची घोषणा कुलगुरुंनी केली, उद्घाटनपर भाषणात म्हणाले, प्राणीशास्त्र विभागाचे रौप्य महोत्सवी वर्ष असून या विभागाची मुहर्तमेढ डॉ. आर.आर. धांडे यांनी केली.  या विभागाने पंचवीस वर्षात आंतरराष्ट्रीय ख्याती मिळविली आहे.  रोजगारक्षम शिक्षण मिळावे, संशोधनाला चालना मिळावी यासाठी विद्याथ्र्यांना हवे ते बदल अभ्यासक्रमात करण्याचा प्राधान्याने विचार करण्याची गरज आहे.  सक्षम विद्यार्थी घडण्यासाठी ते पुढे म्हणाले, परीक्षेच्या तीन तासांत विद्याथ्र्यांचे मूल्यमापन होवू शकत नाही.  शिक्षणातून सक्षम विद्यार्थी घडावा, असा अभ्यासक्रम तयार करण्याची गरज आहे.  अप्लीकेशवर आधारित ज्ञान त्याला मिळायला हवं.  आऊटपुट सेट्रींक, विद्यार्थी केंद्रीत अभ्यासक्रम तयार करतांना उदिष्ट असावं.  विद्यापीठातून बाहेर पडणारा विद्यार्थी हा विद्यापीठाचा आरसा असतो, हे लक्षात घेवून बेसिक, डेव्हलपमेन्ट व अप्लीकेशन अशा तीन भागात अभ्यासक्रम तयार व्हावेत असेही कुलगुरुंनी अधोरेखीत केले.
    अतिथीपर मार्गदर्शनात माजी विभागप्रमुख डॉ. आर.आर. धांडे यांनी प्राणीशास्त्र विभाग सुरु करण्यापासून ते विकसित करण्यापर्यंत पार पाडलेल्या अडचणींवर प्रकाश टाकून विभागाची उत्तरोत्तर झालेली प्रगती मांडली.  समाजोपयोगी संशोधन विभागात झाल्याचेही त्यांनी सांगितले तर विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एफ.सी. रघुवंशी यांनी विद्याथ्र्याला केंद्रबिंदूस्थानी ठेवून  बारकाईने विचार करुन अभ्यासक्रम तयार व्हायला पाहिजेत.  संशोधनाभिमुख, रोजगारभिमुख अभ्यासक्रम असावेत.  विद्याथ्र्याला अभ्यासाची, संशोधनाची आवड निर्माण होईल, यासह चाइस बेस क्रेडीट सिस्टिम अभ्यासक्रमांत लागू करण्यात यावी, असे सांगून कार्यशाळेच्या माध्यमातून चांगले अभ्यासक्रम तयार होतील अशी आशा व्यक्त केली.
    महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पापर्ण व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते सुरुवातीला करण्यात आले.  रोपटे व स्मृतीचिन्ह देऊन अतिथींचा डॉ.सौ.सी.के. देशमुख यांनी सत्कार केला व प्रास्ताविक विवेचनात विभागाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त झालेल्या संशोधन व विकास कामावर प्रकाश टाकला.  यावेळी कुलगुरुंनी शॉल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह देऊन डॉ. आर.आर. धांडे यांचा सत्कार केला.  संचालन डॉ. एच.पी. नांदुरकर यांनी तर आभार डॉ. पी.के.नागले यांनी मानले.  कु. प्रणिता वाकोडे हिने गायिलेल्या पसायदानाने उद्घाटन कार्यक्रमाची सांगता झाली.  उद्घाटन कार्यक्रमाला डॉ. एस.पी. अकर्ते, डॉ.आय.ए. राजा, डॉ.ए.व्ही. अविनाशे, डॉ. श्रीकांत देशपांडे, डॉ. सुरेश झाडे, डॉ.जी.बी. काळे, डॉ. वर्षा झाडे, डॉ.आर.जी. जाधव, प्राणीशास्त्र विषयाचे शिक्षक आणि विद्यार्थी मोठ संख्येने उपस्थित होते.
 

via Blogger http://ift.tt/2njBlqs




from WordPress http://ift.tt/2oywHp5
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.