महेंद्र महाजन जैन / वाशीम –
विद्यार्जन करणार्या गरीब व गरजु मुलामुलींना शाळेत जाण्यासाठी सायकल वाटप करण्याचा आगळावेगळा सामाजीक उपक्रम दर महिन्याला राबविणार्या शहरातील सायकलस्वार ग्रुपच्या वतीने शहरातील चार मुलींना सायकल वाटपाचा प्रेरणादायी उपक्रम शनिवार, 25 मार्च रोजी स्थानिक शिवाजी चौक येथील शर्मा सायकल या दुकानात घेण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाला सायकलस्वार ग्रुपचे सदस्य श्रीनिवास व्यास, अरविंद उलेमाले, मनिष मंत्री, अहिरसर, घुगेसर, कहाकेसर, पवन शर्मा, गजानन इंगोले, आरुसर, मारोती इंगळे, नारायण व्यास, माळी युवा मंचचे जिल्हाध्यक्ष नागेश काळे, अरविंद उचित, समाधान गिर्हे, अरुण इंगोले, डॉ. दिपक ढोके, दिलीप मेसरे, निलेश सोमाणी, राजु गोटे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमामध्ये कु. दिक्षा, कु. संजना गजानन कौसल, कु. खुशी संतोष धामणकर, अविष्कार ताजणे या मुलांना सायकलीचे वितरण करुन त्यांना शिक्षणासाठी मदत करण्यात आली. विशेष म्हणजे या चारही विद्यार्थ्यांची पितृछाया हरविली आहे. अभिनेते अरविंद उचित, पत्रकार संदीप पिंपळकर, नागेश काळे, मुख्याध्यापक अरुण इंगोले यांनी आपल्याकडील सायकली या उपक्रमाकरिता दिल्या होत्या. सदर सायकली शर्मा सायकलचे संचालक पवन शर्मा यांनी सामाजीक भावनेतून निशुल्क दुरुस्ती करुन देतात. हा उपक्रम गेल्या अनेक महिन्यापासून सायकलस्वार ग्रुपच्या वतीने शहरात राबविण्यात येत आहे. आतापर्यत या उपक्रमाच्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थी विद्यार्थीनींना 20 ते 25 सायकलीचे वाटप करण्यात आले. ज्यांच्याकडे शिल्लक सायकली आहेत त्यांनी त्या सायकली सायकलस्वार ग्रुपला आणून द्याव्यात व त्या सायकली शाळेत पायी जाणार्या गोरगरीब विद्यार्थ्यांना या ग्रुपच्या माध्यमातून दिल्या जाव्यात हा या मागचा उद्देश असल्याचे यावेळी श्रीनिवास व्यास यांनी सांगीतले. शहरातील नागरीकांनी अशा प्रकारे आपल्या घरी असलेल्या जुन्या सायकली आणून देवून या सामाजीक उपक्रमाला हातभार लावावा. आपल्या एका मदतीने गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत होईल असे आवाहन सायकलस्वार ग्रुपच्या वतीने यावेळी करण्यात आले.
——————————————————
via Blogger http://ift.tt/2nTOCtI
from WordPress http://ift.tt/2ojYVni
via IFTTT
No comments:
Post a Comment