Latest News

तीर्थक्षेत्र लोणी ते मेहकर चार पदरी राष्ट्रीय दर्जाचा महामार्ग होणार 

जिल्हा प्रतिनिधि / महेन्द्र महाजन जैन
                        

वाशिम  :- रिसोड तालुक्यातील संत सखाराम महाराज संस्थान लोणी ते मेहकर हा रिसोड वरून जाणाऱ्या राष्ट्रीय दर्जाच्या महामार्गाच्या कामाला माजी आमदार ऍड. विजयराव जाधव यांच्या पुढाकारामुळे केंद्रीयमंत्री नितीन गडकरींनी तात्काळ मंजुरी दिली असल्याची माहिती जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.मराठवाड्यातील जिंतूर तालुक्यातील गणेशपुर फाटा-कोठा-वझर या गावांना जोडून विदर्भातील तीर्थक्षेत्र लोणी-रिसोड-मेहकर पुढे नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे.

राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा असल्यामुळे म्हणजे अतिशय मागासलेल्या मराठवाडा व विदर्भाच्या अत्यंत मागासलेल्या या भागाचा विकास साधने शक्य होणार आहे. तालुक्यातील महत्वाचे तीर्थक्षेत्र लोणी ला मराठवाड्यातील भाविक भक्तांची संख्या अधिक आहे या महामार्गामुळे पर्यटकासह भक्तांची मांदियाळी वाढणार आहे. तसेच शेतकऱ्यांना आपल्या मालाची विक्री महानगरात नेण्याकरिता सोयीचे होणार आहे.ऍड विजयराव जाधव यांचा रिसोड हा मतदारसंघ असून भाजपा सरकारच्या काळात अधिक निधीची उपलब्धता करून घेऊन रिसोड-मालेगाव सह जिल्ह्यातील विकास कामे अधिक गतीने करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.विदर्भपुत्र नितीन गडकरी यांनी राज्यातील आवश्यक विकासकामाध्ये राजकारण न करता स्थानिकांच्या मागणीचा तात्काळ विचार करून मान्यता दिलेल्या अनेक कामांपैकी लोणी-मेहकर हा राष्ट्रीय महामार्ग दिल्याबद्दल ऍड जाधव यांनी गडकरींचे आभार व्यक्त केले.कार्यकर्त्यांनी विजयराव जाधव यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तर ऍड जाधव यांनी नवनियुक्त प्रदेश  आमदार ऍड विजयराव जाधव सह जिल्हा उपाध्यक्ष नारायणराव सानप,प्रदेशउपाध्यक्ष अमोल नरवाडे, पं.स सभापती प्रशांत खराटे, उपसभापती कृउबास विठ्ठलराव आरु,संचालक डीगांबर जाधव,अनिल धामणकर इत्यादी भाजपा पदाधीकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

via Blogger http://ift.tt/2nm1jwE




from WordPress http://ift.tt/2mP2O2k
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.