Latest News

पथनाट्यातून साकारले पाणी बचत व मुलगी वाचवाचे वास्तव चित्रण


जिल्हा प्रतिनिधी :- महेंद्र महाजन जैन





वाशीम – भविष्यात उद्भवणारी पाणीटंचाईची दाहकता तसेच मुलींचा जन्मदर वाढविण्याची गरज पथनाट्याव्दारे सादर करुन वाशीम येथील नॅझरीन नर्सिग कॉलेजच्या विद्यार्थीनींनी अप्रतिम कला सादर केली. 23 मार्च रोजी तालुक्यातील सुरकंडी येथे जागृती सेवा केंद्र व ग्रामस्थांच्या वतीने वार्म मिशन अंतर्गत समारोपीय कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होत. यावेळी सदर विद्यार्थीनींनी आपल्या कलेचा अविष्कार घडविला.   
    जागृती सेवा केंद्राच्या वतीने पंचाळा गट ग्रामपंचायत मधील पंचाळा, सुरकंडी खुर्द, सुरकंडी बु, मोहगव्हाण या गावांमध्ये पाणी वाचवा, मुलगी वाचवा, शेती व शेतकरी कसा समृध्द होईल याबाबत वार्म मिशन राबविले गेले. या मिशनचा समारोपीय कार्यक्रम सुरकंडी येथे पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पोलीस पाटील पुंजाजी भोयर हेाते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सेसचे समाजविकास अधिकारी मुकुंद देशमुख होते. यावेळी मंचावर सरपंचा सौ. सुरेखा डुबे, नॅझरीन नर्सिग कॉलेजच्या प्राचार्या रजुला, शिक्षीका कॅरोलीन, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गजानन भोयर, सतिश डुबे, ईमाम दर्गीवाले, तंटामुक्ती अध्यक्ष उस्मान भवानीवाले, मुख्याध्यापक ताकवाले, पिरुभाई बेनिवाले, जागृती सेवा केंद्राच्या अर्शलता डिसुजा आदी उपस्थित होते. यावेळी देशमुख यांनी गावाच्या विकासाच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.
    यावेळी नॅझरीन नर्सिग कॉलेजच्या विद्यार्थीनींनी विविध प्रकारचे पथनाट्य बहारदारपणे सादर करुन भविष्यात पाणीटंचाई किती उग्र रुप धारण करु शकते याची प्रचिती गावकर्‍यांसमोर मांडली. तसेच मुलींना वाचविण्याची गरज नाटकाव्दारे सादर करुन उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू आणले. या विद्यार्थीनींनी तब्बल दोन तास गावकर्‍यांना खिळवून ठेवले. यावेळी जागृती सेवा केंद्राच्या अर्शलता यांनी गावात निस्वार्थपणे राबवि लेल्या जाणार्‍या मिशनची माहिती दिली. पथनाट्य सादरीकरणाचे सुत्रसंचालन खुशबु गुल्हाने या विद्यार्थीनीने केले तर एकूण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सत्यशोधक समाजाचे जिल्हाध्यक्ष गजानन धामणे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार गजानन भोयर यांनी मानले. यावेळी गावातील जि.प. शाळा डिजीटल करण्यासाठी लोकवर्गणीचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला गावकर्‍यांनी उत्तम प्रतिसाद देत लोकवर्गणी जाहीर केली. या कार्यक्रमाला शेकडो नागरीक उपस्थित होते.

via Blogger http://ift.tt/2n57ZvS




from WordPress http://ift.tt/2nUiciW
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.