रोकडरहीत अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी तसेच डिजीटल पेमेट पध्दतीच्या प्रचार प्रसारासाठी राज्यातील पथदर्शी कार्यक्रम अमरावती शहरात राबविण्यात येणार आहे. त्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यानी डिजीदुत म्हणुन काम करावे. उत्तम काम करणाऱ्या टिमला राज्यस्तरावर पुरस्कृत करण्यात येईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयेाजित बैठकीत केले. बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेसी, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास सिध्दभट्टी, जिल्हा अग्रणी बॅक व्यवस्थापक रामटेके यासह समन्वयक ऋषीकेश सरोदे व महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पथदर्शी कार्यक्रमासाठी अमरावती जिल्ह्याची निवड करण्यात आली असुन 32 महाविद्यालयातील जवळपास 6 हजार एनएसएस स्वयंसेवकांमार्फत हा डिजीधन जागरूकता कार्यक्रम शहरात 30 जानेवारी ते 12 फेब्रुवारी या पहील्या टप्पयात राबविण्यात येईल. याच अनुषंगाने उद्या नियोजन भवनात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेत मुख्यमंत्री कार्यालयातील चमुकडुन सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. डिजीधन जागरूकता मोहीम ही दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. 12 फेब्रुवारी नंतर परीक्षेच्या कालावधी संपल्यानंतर दुसरा टप्पा सुरू होईल. एनएसएस स्वयंसेवकांना वेगवेगळ्या डिजीटल पेमेंट पध्दतीविषयी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे स्वयंसेवक महाविद्यालयात व प्रत्येक वर्गावर्गात जाऊन डिजीटल पेमेंटविषयी जागरूकता करतील. उत्कृष्ट काम करणाऱ्या टिमला पुरस्कृत करण्यात येईल.
या पथदर्शी कार्यक्रमातील यशस्वीतेनंतरच संपूर्ण राज्यात अन्यत्र हा कार्यक्रम राबविण्यात येईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगीतले.
बैठकीचे प्रास्ताविक व आभार ऋषीकेश सरोदे यांनी केले.
via Blogger http://ift.tt/2kjr52R
from WordPress http://ift.tt/2jvdlho
via IFTTT
No comments:
Post a Comment