शिवसेना नेते व माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी अकोला येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष श्री सुनील तटकरे यांनी सर्व मान्यवरांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत केले. या पक्षप्रवेश कार्यक्रमादरम्यान बोलताना तटकरे यांनी गुलाबराव गावंडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा केली. यावेळी अकोला युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम गावंडे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख जयंत गावंडे, मुर्तिजापूर शहर प्रमुख पप्पु तिडके, नगरसेवक पंकज गावंडे, माजी नगरसेवक विशाल गावंडे यांच्यासह विविध तालुकाध्यक्ष तसेच आजी-माजी नगरसेवकांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
याप्रसंगी आ. प्रकाश गजभिये , राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोटे पाटील , जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष कोरपे, माजी आमदार तुकाराम बीडकर, प्रदेश संघटक रामेश्वर पवळ, जिल्हाध्यक्ष विजय देशमुख, शहराध्यक्ष अजय तापडिया, शहर समन्वयक मनोहर पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे, ऋषीकेश पोहरे आदी मान्यवर उपस्थित होते.
via Blogger http://ift.tt/2j0n586
from WordPress http://ift.tt/2kdpDN8
via IFTTT
No comments:
Post a Comment