हिंदूंनी आवाज उठवल्यानंतर सरकारी कार्यालयांतील देवतांची चित्रे आणि पूजा बंद करणारे पत्रक सरकारने मागे घेतले आहे. उत्तरप्रदेशमध्ये भाजप अध्यक्ष भाजपला बहुमत मिळण्यासाठी राममंदिर बनवण्याची घोषणा करतात, तर महाराष्ट्रात भाजप सरकार श्रीरामाला कार्यालयाच्या बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. हा काय विरोधाभास आहे ? जर निवडणुका नसत्या, तर या सरकारने एवढ्या लवकर हा निर्णय घेतला असता का ? उशिरा का होईना, भाजप सरकारने चूक दुरुस्त केली. आता भाजपचे सरकार असतांना असा आदेश काढणार्या संबंधित अधिकार्यांवर त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे. ही कारवाई केल्यानंतरच सश्रद्ध समाजाला शांती वाटेल.
via Blogger http://ift.tt/2jGBUJ9
from WordPress http://ift.tt/2jf6Cx2
via IFTTT
No comments:
Post a Comment