Latest News

न.प. निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्यांची संख्या वाढणार ! कॉंग्रेसमध्ये वाढणार बंडखोरीचे प्रमाण ?

चांदुर रेल्वे- (Shahejad Khan)-




ऐन दिवाळीच्या कालावधीतच नगरपरिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. अनेक युवकांमध्ये निवडणुक लढविण्याची उत्सुकता आहे. अशातच पक्षांची उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी सुध्दा करण्यास अनेक दिग्गत पुढे येणार असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
        दिर्घ प्रतिक्षेनंतर काही दिवसांपुर्वी शहरातील नगरपरीषद निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण व निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. नगरसेवकांसाठी सर्व पक्षाकडे उमेदवारांची रिघ लागली होती. या ठिकाणी पक्षांना गर्दीचा सामना करावा लागला. यात एकाची निवड केल्यानंतर इतरांचीही नाराजी मतदारावर परिणामकारक ठरु शकते. शहरातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, तिसरी आघाडी, शिवसेना  आदी पक्ष निनडणुकीच्या मैदानात आहे. प्रत्येक पक्षाचे प्रभागनिहाय उमेदवार जवळपास निश्चित झाले असुन सध्या औपचारीक घोषणा बाकी आहे. त्यामुळे नाराज उमेदवार बंडखोरी करण्याच्या तयारीत दिसत आहे. यंदा अनेक युवक निवडणुक लढविण्याच्या तयारीत असुन प्रत्येक प्रभागातील उमेदवारांची संख्या वाढणार आहे. यासारखाच प्रकार नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतसुध्दा पहायला मिळत आहे. नगराध्यक्षपदाकरीता केवळ तिसऱ्या आघाडीनेच आपला उमेदवार जाहीर केला असुन इतर पक्षांचा निकाल प्रतिक्षाहिन आहे. तिसरी आघाडी वगळता इतर पक्षांत नगराध्यक्षपदाकरीता बंडखोरी होण्याची चिन्हे दिसत आहे. यामध्ये कॉंग्रेस पक्षात बंडखोरीची डाट शक्यता वर्तवली जात आहे तर राष्ट्रवादीकडे जास्त उमेदवार नसल्यामुळे बंडखोरी होणारच नसल्याचे समजते.  येत्या दोन दिवसांत सर्वच पक्षांचे उमेदवार घोषीत केल्यानंतर बंडखोरी करणाऱ्यांची नावे पुढे येणारच आहे. त्यांना अर्ज मागे घेण्यासाठी पक्षांना मोठी कसरत करावी लागणार आहे अन्यथा त्याचे नुकसान त्या-त्या पक्षांना भोगावे लागणार ऐवढे मात्र निश्चित.

via Blogger http://ift.tt/2eV5iZH




from WordPress http://ift.tt/2fiTTaj
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.