Latest News

अवामी लीग पार्टी आणि ऑल इंडिया युथ फेडरेशन यांनी सनातनचे प्रवक्ता अभय वर्तक यांच्या वक्तव्यावरून राजकारण करू नये ! – समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना

श्री. अभय वर्तक यांना पाठिंबा देणार्‍या 
कोल्हापूर येथील सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे आभार !



         कोल्हापूर – महाराष्ट्र १ वृत्तवाहिनीवर १८ ऑक्टोबर या दिवशी आजचा सवाल कार्यक्रमातील चर्चासत्रात जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज आणि मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात बोलत असतांना श्री. निखिल वागळे यांनी सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांना अपमानास्पद वर्तणूक देत त्यांच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार करण्याची धमकी दिली होती. कार्यक्रमात श्री. अभय वर्तक यांनी मुंबई येथे आझाद मैदानावर झालेल्या दंगलीच्या वेळी मुसलमानांनी मराठा महिला पोलिसांवर अत्याचार केल्याचे वक्तव्य केले होते. या कारणावरून सांगली येथे अवामी लीग पार्टीचे अश्रफअली सलीम वांकर आणि त्यांचे सहकारी यांनी श्री. अभय वर्तक यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करण्यासाठी सांगली ग्रामीण पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. ऑल इंडिया युथ फेडरेशनने पोलीस आयुक्तांकडे श्री. अभय वर्तक यांच्या विरोधात केलेली तक्रार निषेधार्ह आहे. अवामी लीग पार्टी आणि ऑल इंडिया युथ फेडरेशन यांनी सनातन संस्थेचे प्रवक्ता अभय वर्तक यांच्या वक्तव्यावरून राजकारण करू नये, असे प्रसिद्धीपत्रक समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या वतीने २३ ऑक्टोबर या दिवशी काढण्यात आले आहे.
         प्रसिद्धीपत्रकावर हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष सर्वश्री चंद्रकांत बराले, कार्यकर्ते शिवाजीराव ससे, बजरंग दलाचे जिल्हाप्रमुख संभाजी साळुंखे, शहरप्रमुख महेश उरसाल, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे, करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, युवा सेनेचे जिल्हा समन्वयक रणजित आयरेकर, शिवसेना उद्योग समूहाचे अध्यक्ष सतीश शिंदे, शिवसैनिक उदय भोसले, उपतालुकाप्रमुख विक्रम चौगले, वन्दे मातरम् युथ ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष अवधूत गुप्ते, योग वेदांत समितीचे राजमोहन स्वामी, श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शरद माळी, श्री संप्रदायाचे शहरप्रमुख एम्.के. यादव, धर्माभिमानी सतीश अतिग्रे, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. 
पत्रकात म्हटले आहे की, 
१. मुंबई येथे १२ ऑगस्ट २०१२ या दिवशी धर्मांधांनी केलेल्या भीषण दंग्याची प्रेरणा बांगलादेश आणि ब्रह्मदेश येथील धर्मांध बांधवांच्या कळवळ्याची अन् राष्ट्रद्रोहाची होती. ही मंडळी देशप्रेम व्यक्त करण्यासाठी जमलेली नव्हती. धर्मांधांनी नियोजनबद्धरित्या महाराष्ट्राच्या राजधानीतच दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करून पत्रकार आणि प्रसारमाध्यमे यांवर आक्रमणे, वाहनांची जाळपोळ, महिला पोलिसांची विटंबना, अमर-जवान ज्योतीची मोडतोड केली. यात सहभागी राष्ट्रदोह्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करून रोखायला हवे होते.
२. रझा अकादमीच्या धर्मांधांनी मुंबईत घडवलेल्या दंगलीत २६ महिला पोलीस भगिनींच्या अब्रूवर हात टाकला. वाहिन्यांच्या ओबी व्हॅन जाळल्या. पत्रकारांनाही मारहाण झाली. हे वास्तव मांडण्याचा श्री. अभय वर्तक यांनी प्रयत्न केला होता.
३. धर्मांध मुसलमानांविषयी थेट वाहिन्यांवर बोलण्याचे धाडस दाखवणे, पोलीस भगिनींची व्यथा मांडण्याचा प्रयत्न करणे, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, हाच श्री. अभय वर्तक यांचा गुन्हा होता का, असा प्रश्‍न आता पडला आहे. त्यांनी विषय चांगल्या पद्धतीने मांडल्याविषयी आम्ही हिंदुत्वनिष्ठ संघटना त्यांचे अभिनंदन करतो.
४. ज्या २६ महिला पोलिसांच्या अब्रूवर धर्मांधांनी हात टाकला, हे पोलिसांनी प्रविष्ट केलेल्या आरोपपत्रात दिले आहे. असे असतांना निखिल वागळे यांनी त्या महिला पोलिसांनाच खोटे ठरवले, म्हणजे पुन्हा त्या भगिनींना काय वाटले असेल ? श्री. अभय वर्तक यांनी हे पुराव्यानिशी मांडत असतांना असे काही घडलेलेच नाही, असा आकांडतांडव करत श्री. अभय वर्तक यांचाच आवाज दाबण्याचा निखिल वागळे यांनी प्रयत्न केला.
५. अशी वस्तूस्थिती असतांना उलट श्री. अभय वर्तक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार्‍या सांगली येथील अवामी लीग पार्टीचे अश्रफअली सलीम वांकर आणि त्यांचे सहकारी, तसेच मुंबई येथील ऑल इंडिया युथ फेडरेशनचा आम्ही निषेध करतो. या लोकांनी एकप्रकारे राष्ट्रद्रोही लोकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला आहे. आझाद मैदानावर धर्मांधांनी घडवलेल्या दंगलीविषयी अवामी लीग पार्टी आणि ऑल इंडिया युथ फेडरेशनचे लोक मूग गिळून गप्प बसले आहेत.
६. भिवंडी येथे मोहरमच्या दिवशी मुसलमानांनी मिरवणूक काढतांना दसर्‍यानिमित्त लावलेली कमान तोडून टाकली. या वेळी धर्मांध मुसलमानांनी केलेल्या दगडफेकीत दोन पोलिसांच्या अंगावर पेट्रोलबॉम्ब टाकल्यामुळे त्यामध्ये दोन पोलीस हवालदार गंभीर, तर एक पत्रकारही घायाळ झाला होता.
७. याचा साधा निषेधही अवामी लीग पार्टीचे अश्रफअली सलीम वांकर आणि त्यांचे सहकारी, तसेच मुंबई येथील ऑल इंडिया युथ फेडरेशनने केला नाही. या लोकांना आझाद मैदान दंगलीतील महिला पोलिसांवर धर्मांधांनी हात टाकलेले दिसत नाही का ? या लोकांनी महिला पोलिसांच्या भावनांचा कधी विचार केला आहे का ?
८. श्री. वर्तक यांच्या विधानावरून कोणीही राजकारण करू नये. येथील सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना पूर्णपणे श्री. अभय वर्तक यांच्या पाठीशी आहेत.

via Blogger http://ift.tt/2eM67nc




from WordPress http://ift.tt/2eFTvQ9
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.