- धमकीची भाषा वापरून समाजातील शांतता बिघडवू पहाणारे लक्ष्मण माने यांच्यावर पोलीस कठोर कारवाई करतील का ?
- आतंकवाद्यांप्रमाणे धमक्या देऊन कायदा हातात घेण्याची भाषा करणारे विद्रोही लेखक लक्ष्मण माने !
- सनातनच्या विरोधात बोलले की प्रसिद्धी मिळते, हे लक्षात आल्याने आजकाल कोणीही येतो आणि सनातनच्या विरोधात बोलतो. माने यांचा हा स्टंट यापेक्षा वेगळा नव्हे.
सातारा- – सनातन अतिरेकी संघटना असून ते बंदुका आणि रायफल चालवण्याचे प्रशिक्षण देतात. धर्मचिकित्सा आणि विवेकावर बोलणार्यांची हत्या करणार्या सनातनचे आगामी काळात दोन्ही आश्रम उद्ध्वस्त करणार आहे. मी आता मोकळा झालो असून मरण्यासाठी सिद्ध आहे. विचारांना मारण्यासाठी तुमच्या बंदुकीत किती गोळ्या आहेत हे दाखवा, असे आव्हान सनातनद्वेषाची कावीळ झालेले धर्मद्रोही लक्ष्मण माने यांनी २१ ऑक्टोबर या दिवशी पत्रकार परिषदेत केले. लक्ष्मण माने नुकतेच सहा महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या आरोपातून मुक्त झाले आहेत. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश वर्षा मोहिते यांनी पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केल्यानंतर माने यांनी स्वतःच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या वेळी लक्ष्मण माने म्हणाले –
१. २०१३ मध्ये माझ्यावर सहा महिलांनी कोणाच्या तरी सांगण्यावरून लैंगिक शोषणाचे फौजदारी स्वरूपाचे गुन्हे प्रविष्ट केले होते. माझी निर्दोष मुक्तता झाली. आरोपाची शहानिशा न करता थेट एखाद्याला अटक करून कारागृहात डांबल्याने त्याचे आयुष्य उद्ध्वस्त होते. तक्रारदाराने केलेले आरोप सिद्ध न झाल्यास तक्रारदारास खोटी तक्रार केल्याविषयी शिक्षा झाली पाहिजे.
२. डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी गेली अनेक वर्षे विवेकी विचारांच्या जोरावर अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम केले. तर कॉ. गोविंदराव पानसरे गरीब आणि कष्टकरी यांच्यासाठी सातत्याने लढा देत होते. ते दिवसा फिरायला गेले असतांना त्यांची गोळ्या घालून हत्या करणार्या सनातन संस्थेने त्याचा हिशेब आधी द्यावा. त्यांना बंदुका आणि रायफली खरेदी करण्यासाठी कोठून निधी उपलब्ध होतो, हे आधी जाहीर करावे, मग दुसर्याला शहाणपणा शिकवावा.
३. दाभोलकरांची दोन्ही मुले साधी आणि सरळ आहेत. त्यांच्या लढाईत मी त्यांच्या पाठीशी आहे. विचारांना गोळ्या घालून मारले जाणार असेल, तर किती बंदुका आणि गोळ्या घालतात, तेच यापुढे पहाणार आहे. धर्मांध संस्था घटनेने दिलेल्या अधिकारांचे बंदुकीच्या टोकावर हनन करणार असतील, तर ते खपवून न घेता, याचा समाचार योग्य पद्धतीने घेतला जाईल.
४. महिला अत्याचार कायद्याच्या दुरुपयोगाविषयी संसदेत चर्चा व्हावी.
via Blogger http://ift.tt/2esxhk1
from WordPress http://ift.tt/2esCGHM
via IFTTT
No comments:
Post a Comment