- केंद्रीय अन्वेषण यंत्रणेला न्यायालयाने पुन्हा फटकारले !
- डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण
पुणे – केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने आरोपपत्र प्रविष्ट केलेले असतांना तपास यंत्रणा हा खटला बंदुकीच्या गोळ्यांच्या अहवालासाठी थांबवून का ठेवत आहे ? तुम्हाला उच्च न्यायालयाने आतापर्यंत अनेक वेळा मुदत दिलेली आहे. हा खटला कायद्यानुसार चालवावा. आतापर्यंत यंत्रणेने अशा प्रकारचे खटले लांबवलेले नाहीत. असे असतांना तुम्हाला स्वतःची अपकीर्ती करून घ्यायची आहे का ? त्यामुळे हा खटला चालू करण्यासाठी पुढील सुनावणी ४ नोव्हेंबरला ठेवण्यात येत आहे, अशा शब्दांत जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी.वाय. लाडेकर यांनी अन्वेषण यंत्रणेचे अतिरिक्त सरकारी अधिवक्ता मनोज चालाडे यांना फटकारले. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाची सुनावणी २१ ऑक्टोबर या दिवशी झाली. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात संशयित म्हणून अटक केलेले सनातनचे डॉ. तावडे यांचे अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर, अधिवक्ता नीता धावडे, अन्वेषण अधिकारी एस्.आर्. सिंग हे उपस्थित होते. या वेळी डॉ. तावडे यांना न्यायालयात उपस्थित करण्यात आले होते.
यापूर्वीच्या सुनावणीच्या वेळी डॉ. तावडे यांच्या वतीने बंदुकीच्या गोळ्यांसंदर्भातील पुरावा नोंदवून नंतर त्या स्कॉटलंड यार्डला पाठवाव्यात, असा विनंती अर्ज न्यायालयाला सादर केला होता. जेणेकरून खटल्यावर त्याचा परिणाम होणार नाही. त्यावर अतिरिक्त सरकारी अधिवक्त्यांनी उत्तर सादर केले आणि खटल्याची सुनावणी बंदुकीच्या गोळ्यांचा अहवाल स्कॉटलंड यार्डहून येईपर्यंत स्थगित ठेवावी, असा वेगळा अर्ज सादर केला. त्यावर अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी अन्वेषण यंत्रणेच्या उत्तरावर लेखी आक्षेप घेणारा अर्ज सादर केला.
खटल्याची सुनावणी पुढे ढकलावी, अशी मागणी अतिरिक्त सरकारी अधिवक्त्यांनी न्यायालयाला केली. त्यावर न्यायाधिशांनी सांगितले की, कलम २२६ नुसार हा खटला अन्वेषण यंत्रणेने चालवणे अपेक्षित असतांना तुम्ही खटला पुढे ढकला, असे कसे सांगू शकता ? तुम्ही उत्तरदायी अधिवक्ता म्हणून तुमचे तसे म्हणणे नोंद करू का अथवा तुम्ही नाही असे सांगा, तसे नोंदवून घेतो. त्यामुळे न्यायप्रणालीचा अभ्यास करून तसे सांगा आणि त्याप्रमाणे खटला चालवावा, अशा शब्दांत पुन्हा एकदा फटकारले.
१. बंदुकीच्या गोळ्या स्कॉटलंड यार्डला पाठवायच्या आहेत, हे सूत्र डिसेंबर २०१५ पासूनच चालू आहे.
२. ६ सप्टेंबर या दिवशी आरोपपत्र प्रविष्ट करतांनाही स्कॉटलंड यार्डला गोळ्या पाठवायच्या होत्या, हे सूत्र अन्वेषण यंत्रणेला माहिती होते. आरोपीला जामीन द्यायचा नसल्यामुळे आरोपपत्र प्रविष्ट केले.
३. स्कॉटलंड यार्डच्या अहवालावरून त्या गोळ्यांचा ३ हत्या प्रकरणांशी काही संबंध आहे का, हे पडताळायचे आहे. त्याचा या प्रकरणाच्या पुराव्याशी आणि डॉ. तावडे यांच्या विरोधात त्यामुळे काय परिणाम होणार आहे ?
४. केंद्रीय अन्वेषण यंत्रणा हा खटला गांभीर्य नसल्यासारखे चालवत आहे.
५. या प्रकरणी सध्या असलेल्या पुराव्यांवरून आरोप निश्चिती झाली पाहिजे.
६. बंदुकीच्या गोळ्या या आरोपीकडून मिळालेल्या नसून त्यामुळे न्यायालयात त्या सादर करून नंतर अन्वेषण यंत्रणेने अमेरिका, रशिया, स्कॉटलंड यार्ड वा अन्य कोठेही पाठवाव्यात. त्याला आमची हरकत नाही.
via Blogger http://ift.tt/2e94l1h
from WordPress http://ift.tt/2egMHN1
via IFTTT
No comments:
Post a Comment