धर्मरक्षणासाठी कृतीशील असणार्या पूज्यपाद
संतश्री आसारामबापू संप्रदायातील साधकांचे अभिनंदन !
झडपोली (जिल्हा पालघर) येथे ख्रिस्त्यांकडून आदिवासी कुटुंबियांचे धर्मांतर होत असल्याचे प्रकरण
पालघर– जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील झडपोली येथील ख्रिस्त्यांनी आमिष दाखवून धर्मांतरित केलेल्या ४५० हिंदु कुटुंबियांना पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू संपद्रायाच्या वतीने हिंदु धर्मात पुनर्प्रवेश देण्यात आला. २२ आणि २३ ऑक्टोबर या दिवशी हा कार्यक्रम पार पडला. संप्रदायाच्या भारतीय युवा शक्ती संघ १३० साधकांनी या कार्यक्रमात सेवा केली. प.पू. आसारामबापू संप्रदायाचे सर्वश्री सर्वेश चौरसिया, संदीप यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
१. श्री गणेश वंदना, गुरुपूजन, प्रार्थना आणि आसारामायणपाठ या स्तुतीपाठाचे पठण करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. या कार्यक्रमात संप्रदायाच्या वतीने महाप्रसाद आणि आरोग्य शिबीर यांचे आयोजन करण्यात आले.
२. भंडार्यामध्ये ३ सहस्रांहून अधिक ग्रामस्थांना भोजन देण्यात आले. प्रत्येक ग्रामस्थाची आस्थेने चौकशी करून त्यांना आजारपणानुसार औषधोपचार करण्यात आला. ४५० कुटुंबियांना संसारोपयोगी साहित्य देण्यात आले. ३५० विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य देण्यात आले. दिवाळीनिमित्त मिठाई आणि स्त्रियांना सौभाग्यलंकार देण्यात आले.
३. विक्रमगड या भागात संपूर्ण आदिवासी आणि मागासवर्गीय समाजाची वस्ती आहे. येथील बहुतांश समाज अशिक्षित असून त्यांची आर्थिक स्थिती बेताची आहे. जेमतेम दोन वेळच्या जेवणाची त्यांची सोय होते. गावात अन्य सोयीसुविधा नाहीत. आतापर्यंत या भागातील २७० मुळे कुपोषणामुळे मृत्युमुखी पडली आहेत.
४. येथील गरिबी, अशिक्षितपणा आणि धर्मशिक्षणाचा अभाव यांचा गैरफायदा येऊन आजूबाजच्या ख्रिस्ती मिशनर्यांनी आमिष दाखवून जवळपास सर्वच ग्रामस्थांचे धर्मांतर करण्यात आले होते.
५. प.पू. संतश्री आसारामजीबापू संप्रदायाच्या साधकांना हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती घेऊन ग्रामस्थांमध्ये धर्मांतरणाविषयी जागृती निर्माण केली.
६. गावचे सरपंच श्री. आकाश चौधरी आणि उपसरपंच श्री. विजय पाटील यांनी ग्रामस्थांच्या जागृतीसाठी सहभाग घेतला. धर्माभिमानी श्री. नीलेश सांबरे यांनी या भागात अंध आणि मतीमंद मुलांसाठी शाळा बांधून दिली. शालोपयोगी साहित्याचा व्यय श्री. सांबरे करतात.
अशा प्रकारे आमिष दाखवून करण्यात आले धर्मांतरण : ग्रामस्थांच्या आजारपणावर उपचार करणे, मुलांना शालोपयोगी साहित्य देणे, अन्न-धान्य, कपडे देणे, हिंदु धर्माविषयी त्यांच्या मनात द्वेष निर्माण करणे अशा प्रकारे कूटनीती वापरून आदिवासी हिंदूंचे धर्मांतरण करण्यात आले. ग्रामस्थांना पैसे देऊन एका ठिकाणी एकत्र करून त्यांना येशूची प्रार्थना सांगण्यात येत असे. प्रत्येकाच्या गळ्यात क्रॉस घालण्यात आला होता.
संप्रदायाच्या वतीने केली जागृती !
१. संप्रदायाच्या साधकांनी ठिकठिकाणी जाऊन हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व, आतापर्यंत धर्मासाठी बलिदान दिलेल्या राष्ट्रपुरुषांचा इतिहास यांविषयी माहिती दिली.
२. साधकांनी विविध उदाहरणे देऊन ईश्वराचे श्रेष्ठत्व ग्रामस्थांना पटवून दिले.
३. ग्रामस्थांना धर्मशिक्षण देण्यात आले.
४. ग्रामस्थांना गळ्यातील क्रॉस काढायला सांगून त्यांना ‘ॐ’,’श्री गणेश’, ‘प.पू. आसारामजीबापू’ यांची चित्रे असलेले पदके देण्यात आली.
via Blogger http://ift.tt/2eHQPAY
from WordPress http://ift.tt/2dYsVma
via IFTTT
No comments:
Post a Comment