Latest News

*नगरपालिका निवडणूक भाजपा मधे तिव्र असंतोष*

अचलपूर:-श्री प्रमोद  नैकेले /—-

अचलपूर नगरपालिका निवडणूकीचा रंग चढत चालला आहे.सर्व
पक्षांनी जवळपास आपले उमेदवार घोषित केले नगराध्यक्ष सरळ जनतेतून निवडल्या
जाणार म्हणून सर्वांचे लक्ष नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराकडे लागले होते काल
29 नामांकनाचा शेवटचा दिवस त्यामुळे सर्व पक्षांनी आपले नगराध्यक्ष पदाचे
उमेदवार जाहीर केले.

प्रहार कडून दिपाली महेन्द्र जवंजाळ,

शिवसेना कडून सुनिता
नरेंद्र फीसके
   –

,भाजपा कडून नीलीमा रूपेश ढेपे –


काँग्रेस शोभा हरीश्चद्र मुगल व
मो.सर्वतांनज्युम साजीद तसेच इतर कुरेशी शहलारूबी मो.सिद्दीकी,राधिका अरूण
घोटकर,वंदना कृष्णराव चोरे,कल्पना संतोष नंदवंशी,

स्वाती राजेश ऊभाड

कमलाबाई
कमलनारायण जयस्वाल रूपाली अभय माथने,अपर्ना सचिन देशमुख असे चौदा
उमेदवारांनी निवडणूकीत आपले नामांकन अर्ज दाखल केले आहे.

रूपाली अभय माथने

या चौदा उमेदवारामध्ये भाजपा मधे मोठी बंडखोरी दिसून येते आहे. केंद्रात
नरेंद्र व राज्यात देवेंद्र म्हणुन नगरपालिकेत सत्ता मिळवण्यासाठी स्थानीक
भाजपा पदाधिका-यांनी कार्यकर्ते गोळा करण्यासाठी त्यांना सत्तेची मोठी
स्वप्ने दाखवून त्यांच्या अपेक्षा वाढवून दिल्या.भाजपचे अच्छेदिन पाहून
वेळेवरच्या पाहुण्यांच्या सुध्दा आशा पल्लवित झाल्या मात्र राजकारण कशाला
म्हणतात हे येथील भाजपचे कार्यकर्त्यांना शेवटी लक्षात आले.भाजपच्या गटात
तिव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.नगराध्यक्ष पदाकरीता
कार्यकर्त्यांमध्ये निराशेचे सुर ऐकायला येत आहेत.यामुळे पुढील रणनीती काय
ठरते व त्याचा परिणाम काय निघतो हे आता सर्वांना उत्सुकतेचे वाटत आहे.

via Blogger http://ift.tt/2dZCrCE




from WordPress http://ift.tt/2fiLNz6
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.