Latest News

नागपूर येथे विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलन

आंदोलनस्थळी बोलतांना ह.भ.प. श्री वणवे महाराज

     नागपूर – येथे सक्करदरा चौकात राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. आंदोलनात शिवसेना, वारकरी संप्रदाय अशा विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा पाठिंबा लाभला. या वेळी आरोग्यास आणि पर्यावरणास घातक अशा चिनी बनावटीच्या फटाक्यांवर, तसेच चिनी वस्तूंवर बंदी घालावी, शत्रुराष्ट्र पाकिस्तानातील कलाकारांना भारतात काम करून पैसे कमावण्यावर बंदी घालावी आणि छत्रपती शिवरायांचे २३ किल्ले खाजगी व्यक्तींच्या कह्यात आहेत, ते त्वरित शासनाने अधिग्रहीत करून त्यांना राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे आणि त्यांचे संवर्धन करावे, अशा मागण्या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आल्या. 
     आंदोलनास वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. श्री वणवे महाराज यांची वंदनीय उपस्थिती लाभली. ह.भ.प. श्री वणवे महाराज म्हणाले, चिनी वस्तू विकत घेतल्याने सगळा पैसे चीनला मिळतो. आपल्या देशबांधवांना त्याचा काहीही लाभ होत नाही. म्हणून महाग असल्या तरी केवळ स्वदेशात सिद्ध झालेल्या वस्तूंचाच उपयोग करायला हवा आणि चिनी बनावटीच्या वस्तूंवर जनतेनेच बहिष्कार घालायला हवा. 
     बाजारपेठेत मोकळी जागा उपलब्ध नसतांना मे. शैलेश इलेक्ट्रीकलचे मालक श्री. आशिष सुरुशे यांनी त्यांच्या दुकानासमोर आंदोलन करण्यास अनुमती देऊन सहकार्य केल्यामुळेच हे आंदोलन यशस्वीरीत्या पार पडले. आंदोलन स्थळी उपस्थित पोलिसांनीही आपले कार्य उत्तम असून असे कार्यक्रम पुढेही घ्या, आम्ही पूर्ण सहकार्य करू, असे आश्‍वासन दिले. 

क्षणचित्र

     मराठा क्रांती मूक मोर्च्याचे एक कार्यकर्ते आंदोलन झाल्यानंतर समितीच्या कार्यकर्त्यांना भेटले आणि त्यांना आंदोलनातील विषय अतिशय आवडल्याचे आवर्जून सांगितले. मला तुमचे विषय व्हॉट्स अ‍ॅपवर पाठवत चला, मी ते आमच्या गटात टाकीत जाईन, असे सांगितले आणि लगेच समितीच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या गटामध्ये सामील करून घेतले.

via Blogger http://ift.tt/2eIVGC8




from WordPress http://ift.tt/2ezmAO0
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.