हिंदुत्वनिष्ठांचे सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून आवाहन
पुणे- २६ वर्षांपूर्वी आपल्याच देशात विस्थापित झालेल्या काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमध्ये सन्मानाने पुनर्वसन व्हावे, या उद्देशाने शनिवारपेठेतील रमणबाग शाळेच्या पटांगणात २३ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता विराट हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. काश्मिरी हिंदूंना पाठिंबा देण्यासाठी या हिंदु धर्मजागृती सभेस उपस्थित रहा, असे आवाहन करणारी मान्यवर व्यक्तींची चलचित्रे (व्हिडिओ), तसेच पोस्टर्स सध्या सामाजिक संकेतस्थळांवरून (सोशल मिडियावरून) फिरत आहेत. मान्यवर हिंदुत्वनिष्ठांच्या या चलचित्रांना उत्तम प्रतिसाद मिळत असून नागरिकांमध्ये सभेची उत्सुकता निर्माण झाली आहे.
हिंदुत्वनिष्ठ नेत्यांनी चलचित्राच्या माध्यमातून केलेली आवाहने
१. श्री. प्रमोद मुतालिक, राष्ट्रीय अध्यक्ष, श्रीराम सेना – पाकिस्तान संपूर्ण भारताला इस्लामी राष्ट्र बनवू पहात आहे. जिहादी आतंकवादाची समस्या केवळ भारताची नाही, तर संपूर्ण देशाची आहे; म्हणूनच हिंदूंनो, एक भारत अभियान – चलो कश्मीर या अभियानात सहभागी व्हा. श्रीराम सेना आवाहन कत आहे की, संघटित होऊन पुण्यात होणारी हिंदु धर्मजागृती सभा यशस्वी करा !
२. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, सनातन संस्था – हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी जो संघर्ष करावा लागेल, त्याच्या ठिणगीतूनच हिंदु राष्ट्राचा उदय होईल. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दिशेतील एक टप्पा असलेल्या एक भारत अभियानात सहभागी होऊन काश्मिरी हिंदूंच्या पाठीशी उभे रहा.
३. श्री. राहुल कौल, अध्यक्ष, युथ फॉर पनून कश्मीर – जेवढे काही हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी बांधव एक भारत अभियानाला जोडले जात आहेत, त्यांच्यामुळे काश्मिरी हिंदू कधी एकटे पडणार नाहीत, याचा विश्वास वाटतो. हिंदु धर्मजागृती सभेला बहुसंख्येने उपस्थित रहा.
४. श्री. जगमोहन कौल, अध्यक्ष, काश्मिरी हिंदु सभा, पुणे – केवळ काश्मीरसाठी नाही, तर संपूर्ण देशासाठी ! भारतियत्व अनुभवण्यासाठी हिंदु धर्मजागृती सभेला या !
५. श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती – काश्मिरी हिंदू जिहादी आतंकवादाचे बळी ठरले. काश्मिरी हिंदूंना पुन्हा भारताच्या नंदनवनात त्यांच्या घरी स्थायिक करायचे असेल, तर देशभरातील १०० कोटी हिंदूंचे संघटन व्हायला हवे. त्यासाठीच पुणे येथे होणार्या हिंदु धर्मजागृती सभेला उपस्थित रहा.
६. श्री. अभय वर्तक, राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था – वर्ष १९९० मध्ये काश्मिरी हिंदूंवर प्रचंड अत्याचार झाला. तेथील हिंदूंच्या सामूहिक हत्या करण्यात आल्या. मंदिरे भ्रष्ट करण्यात आली. याचा आपल्याला सामना करायचा असेल, तर आपल्याला आपल्या राष्ट्रासाठी घराबाहेर पडावे लागेल. काश्मिरी हिंदूंना पाठिंबा देण्यासाठी पुण्यात होणार्या हिंदु धर्मजागृती सभेला बहुसंख्येने उपस्थित रहा.
७. श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती – सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना काश्मिरी हिंदूंच्या पाठिशी आहेत, हे दाखवून देण्यासाठी पुण्यात होणार्या हिंदु धर्मजागृती सभेला उपस्थित रहा.
८. अधिवक्ता देवदास शिंदे, प्रदेशाध्यक्ष, लष्कर-ए-हिंद – २६ वर्षांपासून विस्थापितांचे जीवन जगत असणार्या काश्मिरी धर्मबांधवांच्या पनून कश्मीरच्या (आपल्या काश्मीरच्या) मागणीला पाठिंबा देण्यासाठी धर्मजागृती सभेला उपस्थित रहा.
९. ज्येष्ठ विधीज्ञ अधिवक्ता दादासाहेब बेंद्रे – काश्मिरी हिंदूंवर वर्षानुवर्षे अन्याय होत आला आहे. त्यांना जिहादी आतंकवादामुळे त्यांची घरे सोडून काश्मीर सोडून देशाच्या इतर भागात आश्रय घ्यावा लागला. काश्मीरमध्ये असलेल्या आतंकवादाला उत्तर देण्यासाठी ही हिंदु धर्मजागृती सभा आयोजित केली आहे. सर्व हिंदु जनतेने या सभेत सहभागी व्हावे.
१०. अधिवक्ता श्री. सत्यजित तुपे, सचिव, पुणे बार असोसिएशन – काश्मिरी हिंदु बांधवांच्या हक्कासाठी आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेला पुणे बार असोसिएशनचा संपूर्ण पाठिंबा आहे. काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमध्ये सन्मानाने पुनर्वसन व्हावे, यासाठी एक हिंदुस्थानी नागरिक म्हणून सभेला उपस्थित रहा.
११. श्री. उत्तम दंडिमे, हिंदु स्वाभिमान प्रतिष्ठान – जिहादी आतंकवादाच्या विरोधात आणि काश्मिरी हिंदु बांधवांचे कायमस्वरूपी पुनर्वसन व्हावे, यासाठी आयोजित केलेल्या विशाल हिंदु धर्मजागृती सभेत धर्मकर्तव्य म्हणून सहभागी व्हा. हिंदु स्वाभिमान प्रतिष्ठान यात संपूर्णपणे सहभागी होत आहे. तुम्हीही व्हा !
१२. श्री. विजय पाटील, पुणे शहराध्यक्ष, हिंदु एकता आंदोलन पक्ष – सरकारला जाग आणण्यासाठी संघटित व्हा आणि हिंदु धर्मजागृती सभेला उपस्थित रहा.
१३. डॉ. पांडुरंग बलकवडे, ज्येष्ठ इतिहास संशोधक – एक भारत अभियानाला माझे पूर्ण समर्थन असून अधिकाधिक जणांनी धर्मसभेला उपस्थित रहावे.
via Blogger http://ift.tt/2esC8Sc
from WordPress http://ift.tt/2egPhm2
via IFTTT
No comments:
Post a Comment