Latest News

तिसऱ्या आघाडीतर्फे श्री नितीन गवळींच्या नावावर शिक्कामोर्तब.- निवडणूक नगराध्यक्ष पदाची

तिसऱ्या  आघाडीच्या बैठकीत एकमताने निर्णय.

चांदुर रेल्वे- (शहेजाद खान )


 ऐन दिवाळीच्या कालावधीतच नगरपरिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. यंदा नगराध्यक्षही थेट जनतेमधुन निवडुन येणार आहे. कमी दिवसांत नगराध्यक्षपदासाठी उमेदवार शोधण्यात प्रत्येक पक्षाला मोठी कसरत करावी लागत आहे. अशातच सद्या चर्चेत असलेल्या तिसऱ्या आघाडीने नगराध्यक्षपदासाठी उमेदवार घोषीत केला आहे. सक्रीय नगरसेवक म्हणुन ओळख असलेले नितीन गवळींच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे.
       स्थानिक नगरपरीषदमध्ये तब्बल १५ वर्षानंतर नगराध्यक्षची थेट जनतेतुन निवड होणार आहे. त्यातही हे पद ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित असल्यामुळे अनेक दावेदार पक्षापुढे आहे. भाजप, कॉंग्रेस, तिसरी आघाडी, राष्ट्रवादी, शिवसेना आदी पक्षांसह अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या मैदानात राहणार आहे. यामध्ये सगळ्यात पहिले तिसऱ्या आघाडीने नगराध्यक्ष पदाचा उमेदवार घोषीत केला आहे. स्थानिक ढोले कॉम्पलेक्समध्ये नुकतीच तिसऱ्या आघाडीची बैठक माजी आमदार डॉ. पांडुरंग ढोले, सुमेरचंद जैन, राजाभाऊ भैसे, नितीन गवळी, कॉ. रामदास कारमोरे, कॉ. विनोद जोशी, महादेव शेंद्रे, बंडु यादव, भिमराव खलाटे, मनोज महाजन, मुकुल परगणे, घोडेस्वार सर आदींच्या उपस्थितीत पार पडली. यामध्ये सर्वांचे मत जाणुन घेतल्यानंतर व नगरपरीषदमधील सक्रीय सहभाग व लोकप्रियतेमुळे नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणुन नितीन गवळींच्या नावाची घोषणा डॉ. पांडुरंग ढोले व सुमेरचंद जैन यांनी केली. नितीन गवळींनी मागील पाच वर्षात अडीच वर्ष उपाध्यक्षपद व अडीच वर्ष आरोग्य, शिक्षण व स्वच्छता सभापतीपद भुषविले आहे. तसेच शहरवासीयांच्या हितासाठी अनेक आंदोलनेसुध्दा केली आहे. त्यामुळे ते नगराध्यक्षपदासाठी एक प्रबळ दावेदार मानले जात आहे. तिसऱ्या आघाडी व्यतीरीक्त इतर कोणत्याही पक्षाने सद्या उमेदवाराची घोषणा केलेली नाही. नगरपरिषदेत सर्वच पक्षाकडून स्वबळावर लढण्याची तयारी सुरु आहे. उमेदवार शोधण्याची शेवटची घटकाजवळ आली असतानाही कोणत्याच पक्षाकडून आघाडी अथवा युतीची चर्चा केली जात नाही. प्रत्येक जण स्वतंत्ररित्या आपला उमेदवार उभा करण्यासाठी धडपडत आहे. त्यामुळे निवडणुकीत चुरस आणखीच वाढली आहे. 

via Blogger http://ift.tt/2eJPz0k




from WordPress http://ift.tt/2ewOf3j
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.