Latest News

पू. आसारामबापूंची निर्दोष सुटका होईल ! – पू. संभाजीराव भिडे गुरुजी

पू. गुरूजींकडून सनातनच्या कार्याचे कौतुक
बैठकीला उपस्थित पू. बापूजींचे साधक आणि अन्य कार्यकर्ते 

     अमरावती – ढग सूर्याला खाऊ शकत नाही, केवळ काही काळापुरते झाकाळु शकतात आणि तेही दुरूनच. सूर्याच्या जवळ ते जाऊ शकत नाहीत; कारण सूर्य शेवटीसूर्यच आहे. पू. आसारामबापूंवर लावलेले आरोप खोटे असून लवकरच बापूंची निर्दोष सुटका होईल, असे मत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे संस्थापक पू. संभाजीराव भिडे गुरुजी यांनी संत पू. आसारामजी बापू यांच्या अमरावती येथील आश्रमात बोलतांना व्यक्त केले. 
     श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या स्थानिक शाखेद्वारे बापूंच्या अमरावती आश्रमात पू. भिडे गुरूजींच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत श्री योग वेदांत सेवा समितीचे सचिव श्री. मानव बुद्धदेव, श्री. दयाराम राठोड, श्री. नंदलाल तरडेजा आणि श्री. रामेश्‍वर इंगोले यांनी गुरूजींचा श्रीफळ अन् पू. बापूजींची पुस्तके भेट देऊन सन्मान केला. पू. बापूजींच्या साधकांशी चर्चा करतांना त्यांनी वरील विधान केले. 

सनातनच्या कार्याला जोड नाही, तोड नाही, उपमा नाही, बरोबरी नाही !

     सनातन संस्थेविषयी बोलतांना गुरुजी म्हणाले, सनातनच्या कार्याला जोड नाही, तोड नाही, उपमा नाही, बरोबरी नाही. तसेच दैनिक सनातन प्रभात हे सत्यनिष्ठ असून ते भारतातील सर्वच भाषांमध्ये निघाले पाहिजे. सभेला मार्गदर्शन करतांना गुरूजींनी येत्या डिसेंबर महिन्यात आयोजित गडकोट मोहिमेत सहभागी होण्याचे उपस्थितांना आवाहन केले. या प्रसंगी गुरूजींनी क्षात्रतेज जागवणारी गीते सर्वांना सामूहिक म्हणायला लावली. सभेला श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. अभिषेक दीक्षित, श्री. महेश लढके, हिंदु जनजागृती समितीचे श्री. नीलेश टवलारे, युवा सेवा संघाचे श्री. राहुल नेरकर तसेच अमरावती, बडनेरा, नागपूर, कारंजा, नेर, मोर्शी आदी अनेक शहरांतील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी आणि विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, युवा सेवा संघ आदी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

via Blogger http://ift.tt/2e2d7fK




from WordPress http://ift.tt/2eenTSd
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.