Latest News

चायना प्रॉडक्ट एक्झिबिशन २०१६ रहित करा; चिनी उत्पादनांवर बहिष्कार घाला !

वाशी येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात राष्ट्रप्रेमी नागरिकांची मागणी !
आंदोलनाला उपस्थित राष्ट्र आणि धर्म प्रेमी नागरिक 
     नवी मुंबई –नुकतेच चीनच्या शासकीय वृत्तपत्रातून चिनी उत्पादने घेऊ नका, असे भारतीय हे केवळ भुंकू शकतात, बाकी काही करू शकत नाहीत, अशा आशयाचा करणारा लेख प्रसिद्ध केला आहे. चीनमध्ये बनवण्यात आलेल्या विविध वस्तूंची विक्री वाढवण्यासाठी १५ ते १७ नोव्हेंबर या कालावधीत मुंबई येथे चायना प्रॉडक्ट एक्झिबिशन २०१६चे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन भरवणे म्हणजे आपल्या देशाचे अहित करणार्‍या देशाला अर्थसाहाय्य करण्यासारखे आहे. भारतात वारंवार आतंकवादी कारवाया करणार्‍या पाकिस्तानला चीन नेहमीच उघडपणे साहाय्य करत आहे. चीनच्या हेकेखोरपणाला उत्तर देण्यासाठी आणि जनभावनांचा आदर राखण्यासाठी या प्रदर्शनाची अनुमती रहित करावी, अशी मागणी २२ ऑक्टोबर या दिवशी वाशी येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनात करण्यात आली.
      आंदोलनात हिंदू राष्ट्र सेनेचे श्री. भालचंद्र गायकवाड, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वश्री अजय बर्गे, स्वप्नील यादव, बजरंग दलाचे सर्वश्री संदीप भगत, अक्षय सरक, मराठा मित्रमंडळाचे श्री. संदीप गोळे, पामबीच रोड येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख श्री. सुनील थळे, शिवसेनेच्या महाराष्ट्र वितरक सेनेचे श्री. वैभव साळुंके, हिंदू महासभेचे श्री. मंगेश म्हात्रे, योग वेदांत समितीचे श्री. नानकचंद्र मिश्रा, गोभक्त श्री. संदीप शर्मा, हिंदु जनजागृती समितीचे मुंबई प्रवक्ता डॉ. उदय धुरी यांसह एकूण ५० राष्ट्र आणि धर्म प्रेमी नागरिक उपस्थित होते. 
       या वेळी सहस्रो कोटी रुपयांची आर्थिक हानी करणार्‍या प्रदूषणकारी फटाक्यांवर तात्काळ बंदी घालावी, शिवछत्रपतींचा वारसा असलेले; मात्र राज्यातील खाजगी लोकांकडे असलेले किल्ले राज्य शासनाने कह्यात घेऊन त्यांना त्वरित संरक्षित स्मारक घोषित करण्यात यावे, अशा मागण्याही करण्यात आल्या.
राष्ट्रप्रेमींचे उद्बोधक विचार गडकोट किल्ल्यांचे संरक्षण करणे हे राज्यशासन आणि 
पंतप्रधान यांचे नैतिक दायित्व ! – अजय बर्गे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान 
       अरबी सागरात शिवरायांचे स्मारक होणे, ही चांगली गोष्ट आहे; मात्र शिवकाळाची तेजस्वी ओळख देणारे गड, दुर्ग आणि किल्ले यांची पडझड होत असतांना स्वस्थ बसणे शिवभक्त सहन करू शकत नाहीत. गडकोट किल्ल्यांची होणारी पडझड रोखण्यासाठी शिवभक्त कार्य करत आहेत. गडकोट किल्ल्यांचे संरक्षण करणे, ही राज्यशासन आणि पंतप्रधान यांचे नैतिक दायित्व आहे.
भारतियांनी चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकावा ! – स्वप्नील यादव, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान
      शिवरायांनी त्याकाळात राबवलेला व्यापार आणि भाषा धोरणे सध्याही राबवायला हवीत. गड, किल्ले यांची डागडुजी व्हायला हवी. भारतियांनी चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकायला हवा.
चीनच्या इकॉनॉमिक वॉरचा भारतियांनी हुशारीने विरोध करावा ! – मंगेश म्हात्रे, हिंदु महासभा
     आजच्या खुल्या अर्थव्यवस्थेत भारताला चीनवर बहिष्कार टाकणे आंतरराष्ट्रीय करारांमुळे शक्य नाही. भारतियांनी चीनवर बहिष्कार टाकावा. चीन भारताला सर्व उत्पादनांसाठी बाजारपेठ बनवत असून या इकॉनॉमिक वॉरचा भारतियांनी हुशारीने विरोध करायला हवा ! 
चिनी वस्तूंचे प्रदर्शन मेक इन इंडियाच्या आवाहनाला हरताळ फासणारे ! 
– डॉ. उदय धुरी, हिंदु जनजागृती समिती
      चिनी वस्तूंचे प्रदर्शन भरवणे म्हणजे आपल्या देशाचे अहित करणार्‍या देशाला अर्थसाहाय्य करण्यासारखे आहे. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी मेक इन इंडियासारखे उपक्रम राबवत असतांना चीनमधील वस्तूंच्या विक्रीसाठी अशा प्रकारचे प्रदर्शन भरवणे, हे पंतप्रधानांच्या आवाहनाला हरताळ फासणारे आहे.
      अब्जावधी रुपयांचा नफा उकळून वर भारतविरोधी भूमिका घेणार्‍या चीनला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. 
– श्री. अस्मित कोंडाळकर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

via Blogger http://ift.tt/2eIWwPp




from WordPress http://ift.tt/2dAnGLf
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.