Latest News

“शिवसेना पक्षाचा सद्स्य नोंदणीचा शुभारंभ” -अमरावती महानगर पालिका (२०१७) निवडणूकीला सामोरे जाणे करीता मोर्चेबांधनी सुरू

अमरावती/—


नजीकच्या काळात होऊ घातलेल्या अमरावती महानगर पालिका(२०१७) निवडणूकीला सामोरे जाणे करीता मोर्चेबांधनी सुरू झाली असून हिंदूहृदयसम्राट मा.बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत विचार सोबत घेऊन मा.शिवसेना पक्षप्रमुख श्री ऊद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पक्ष बळकटीकरण व संघटना मजबूत करणे करीता मा.खा.तथा संपर्क प्रमुख श्री अरवींदजी सावंत तथा अमरावती जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष खासदार श्री आनंदरावजी अडसूळ साहेब यांचा  आदेशावरुन व श्री राजेशजी वानखडे शिवसेना जिल्हा प्रमुख यांच्या मार्गदर्शनात भव्य शिवसेना सदस्य नोंदणीला स्थानिक प्रभाग क्रमांक ५ (महेंन्द्र काँलनी)  प्रभागातील संतोषीमाता नगर येथून मोठ्या धूमधडाक्यात सुरूवात करण्यात आली.परिसराचे शिवसेनेचे उपशहर प्रमुख  श्री आशिष ठाकरे, विभाग प्रमुख श्री अविनाश देशमुख यांचे प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला महेंन्द्र काँलनी हा प्रभाग मागिल निवडणूकीत पक्षाची पिछेहाट पाहता आता शिवसेनेने कंबर कसून कामाला लागली आहे नगर तेथे शाखा…शाखा तेथे सदस्य असे अभियान राबवत सदस्य नोंदणीत आगेकूच करत आतापासूनच पदाधिकारी,शिवसैनिक कामाला लागले असून परिसरातील नागरिकांच्या गाठीभेटीला सूरुवात करून प्रचारात आघाडीवर होत आगेकूच करत आहेत, स्थानिक नागरिकांचे समर्थन व चांगला प्रतीसाद पण या माध्यमातून लाभत आहे.परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणुन घेत त्या समस्यांचे निराकरण करणे करीता शिवसैनीकांनी व पदाधीकार्यानी स्वतंत्र कक्ष स्थापन करून त्या माध्यमातून जनतेचा विश्वास संपादन करण्याचे अभियानच सुरू केले आहे.या प्रसंगी सर्व  श्री आशिष ठाकरे (शिवसेना उपशहर प्रमुख),अविनाश देशमुख (विभाग प्रमुख),बंडू देशमुख (युवा सेना जिल्हा समन्वयक) संजय वानरे, अजय नागापुरे,नंदू काळे,बंडू कथिलकर,जयंत ईंगोले,दिपक गडवाले,प्रफूल्ल गोबरे, चिंतामणी गहूकार,विवेक वासनकर,महेश लोखंडे,राजेश पाचघरे, श्याम खंडारे, देविदास खंडारे ईत्यादी मोठ्या संख्येने पदाधीकारी शिवसैनिक व परिसरातील नागरिक उपस्थीत होते.

via Blogger http://ift.tt/2eNqHVF




from WordPress http://ift.tt/2f3tSfT
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.