Latest News

सनातनचा एक ग्रंथ म्हणजे १०० चांगल्या मित्रांच्या समान ! – भाजपचे माजी आमदार श्री. अप्पासाहेब पट्टणशेट्टी

डावीकडून साधिका श्रीमती गंगा वठार, 
श्री. अप्पासाहेब पट्टणशेट्टी, साधक 
श्री. सुरेंद्र चाळके आणि श्री. विठ्ठल कटकधोंड
      विजयपूर (कर्नाटक) – येथील श्री सिद्धेश्‍वर देवस्थानसमोर सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. २२ ऑक्टोबरला विजयपूरचे भाजपचे माजी आमदार श्री. अप्पासाहेब पट्टणशेट्टी आणि विजयपूरचे भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री. विठ्ठल कटकधोंड यांनी ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली. श्री. पट्टणशेट्टी म्हणाले की, आध्यात्माद्वारे जीवनातील तणावाचे निवारण करणारे ग्रंथच उत्तम साधन आहे. हे ग्रंथ मनुष्यातील असणारे अज्ञान दूर करून दिव्य ज्ञानाचा प्रकाश देणारे आहेत. सनातनचा एक ग्रंथ म्हणजे १०० चांगल्या मित्रांच्या समान आहे. हे एक सामाजिक सुधारणेचे चांगले कार्य आहे. सनातनचे ग्रंथ प्रदर्शन यशस्वी होवो.

via Blogger http://ift.tt/2eLWkl3




from WordPress http://ift.tt/2egEvXx
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.