दीपप्रज्वलन करताना डावीकडून सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, सर्वश्री रमेश
|
पुणे – ज्या मैदानावरून लोकमान्य टिळक यांनी स्वराज्याचा उद्घोष केला, त्या न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग शाळेच्या मैदानावर एक भारत अभियान – चलो कश्मीर की ओर अंतर्गत ऐतिहासिक १२ वी सभा पार पडली. या वेळी जमलेले हिंदुत्वनिष्ठ आणि सह्याद्रीचे मावळे यांनी जय भवानी जय शिवाजी या घोषात काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन काश्मीरमध्ये झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही !, असा दृढ निश्चय केला ! पनून कश्मीर, हिंदु जनजागृती समिती, काश्मिरी हिंदू सभा पुणे, लष्कर-ए-हिंद, हिंदु एकता आंदोलन पक्ष यांनी आयोजित केलेली ही सभा अन्य हिंदुत्ववादी संघटनांच्या भरीव सहभागाने साकारली !
वर्ष १९९० मध्ये जिहादी आतंकवादाचे पहिले बळी काश्मिरी हिंदू ठरले. जिहाद्यांनी काश्मीर खोर्यातून साडेचार लाख हिंदूंना हाकलले. गेली २६ वर्षे हे निर्वासित काश्मिरी हिंदू स्वदेशातच विस्थापितांचे दुर्दैवी जीवन जगत आहेत; मात्र मतांध राजकारणामुळे कोणीही त्यांच्याकडे लक्ष दिलेले नाही. काश्मीरनंतर आता उत्तरप्रदेशमधील कैराना, मुझफ्फरनगर आदी भागांतून हिंदू विस्थापित होत आहेत. देशात राष्ट्रवादी विचारसरणीचे शासन आलेे असल्याने हिंदूंचे हे विस्थापन रोखले जावेे आणि काश्मिरी हिंदूंचे काश्मीर खोर्यात सन्मानाने पुनर्वसन व्हावे, या मागणीला अनुसरून देशभरातील धर्मप्रेमी संघटनांनी एक भारत अभियान-कश्मीर की ओर हे राष्ट्रव्यापी अभियान आरंभले आहे.
या अभियानात देशभरातील १०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटना यात सहभागी झाल्या आहेत.
या सभेमध्ये पनून कश्मीरचे अध्यक्ष डॉ. अजय च्रोंगू, युथ फॉर पनून कश्मीरचे राष्ट्रीय संयोजक श्री. राहुल कौल, श्रीराम सेनेचे अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक, जम्मू फॉर इंडियाचे समन्वयक डॉ. हरि ओम, भारत रक्षा मंचचे महासचिव श्री. अनिल धीर आणि संयोजक श्री. मुरली मनोहर शर्मा, शिवसेना तेलंगण आणि आंध्रप्रदेशचे राज्य अध्यक्ष श्री. टी.एन्. मुरारी, शिवसेना तमिळनाडूचे श्री. राधाकृष्णन्, हिंदू फ्रंट फॉर जस्टीसचे राष्ट्रीय प्रवक्ता अधिवक्ता श्री. विष्णु शंकर जैन, लष्कर-ए-हिंदचे प्रदेशाध्यक्ष अधिवक्ता श्री. देवदास शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. अभय वर्तक, तसेच सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी उपस्थितांना संबोधित केले.
via Blogger http://ift.tt/2dAiRRN
from WordPress http://ift.tt/2eemomF
via IFTTT
No comments:
Post a Comment