पुणे – पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या खाजगी वाहनांवर पोलीस असे लिहिलेले असणे आणि पोलीस दलाचे चिन्ह लावण्याच्या वाढत्या तक्रारीमुळे गृह विभागाने ७ सप्टेंबर २०१५ या दिवशी परिपत्रक काढले होते. त्यानुसार पोलिसांच्या खाजगी वाहनांवर वरील पद्धतीने लिहिल्यास वा तसे लिहिणार्यावर कारवाईचे आदेश देण्यात आले; परंतु अशी वाहने सर्रास दिसत असूनही मागील वर्षभरात कारवाई करण्यात आली नाही, असे लोकहित फाऊंडेशनने मागवलेल्या माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या माहितीत उघड झाले. गृह विभागाचे हे आदेश परिवहन आयुक्तालयाने सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना दिले आहेत.
via Blogger http://ift.tt/2f1aw61
from WordPress http://ift.tt/2eYTFC7
via IFTTT
No comments:
Post a Comment