पुणे- – काश्मिरी हिंदूंच्या हक्कांसाठी पुणे येथे आज २३ ऑक्टोबर या दिवशी विराट हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
पनून कश्मीर, हिंदु जनजागृती समिती, काश्मिरी हिंदू सभा पुणे, लष्कर-ए-हिंद, हिंदु एकता आंदोलन पक्ष आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने या धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीराम सेनेचे अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक, पनून कश्मीरचे अध्यक्ष डॉ. अजय च्रोंगू, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, सनातन संस्थेच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. अभय वर्तक, शिवसेना-तेलंगणचे श्री. टी. एन्. मुरारी, ओडिशा येथील भारत रक्षा मंचचे श्री. अनिल धीर आदी हिंदुत्वनिष्ठ नेते सभेला संबोधित करणार आहेत.
पुण्याच्या आसपास पेठ, नारायणगाव, पिंरगुट, पौड, मुळशी, भूगाव, शिरवळ आदी ४० हून अधिक गावांमध्ये धर्मजागृती सभेचा प्रसार झाल्यानंतर ग्रामस्थांनी गाड्या करून धर्मसभेला येण्याचे निश्चित केले आहे. मुळशी तालुक्यातील ट्रॅक्स, तसेच टमटम या वाहनांच्या चालकांच्या संघटनेचे अध्यक्ष श्री. शंकर येनपुरे आणि अन्य १४ वाहनचालक यांची बैठक झाली. त्या वेळी वाहनचालकांनी आम्ही प्रत्येकी किमान २ ट्रॅक्स भरून ग्रामस्थांना घेऊन सभेला उपस्थित राहू, असे सांगितले.
via Blogger http://ift.tt/2eUav8Z
from WordPress http://ift.tt/2ejsx4X
via IFTTT
No comments:
Post a Comment