फोंडा (गोवा) येथे निदर्शनाद्वारे हिंदु संघटनांची मागणी
फलक घेऊन निदर्शने करतांना राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी हिंदू |
फोंडा (गोवा), २७ ऑक्टोबर (वार्ता.) – प्रदूषणकारी आणि हिंदूंच्या देवता अन् राष्ट्रपुरुष यांची विटंबना करणार्या फटाक्यांची निर्मिती आणि विक्री थांबवावी, तसेच अवैधपणे विक्री होत असलेल्या चिनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी घालावी. नागरिकांनी या फटाक्यांचा वापरही टाळावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी २६ ऑक्टोबर या दिवशी फोंडा शहरात निदर्शनाद्वारे केले.
दुकानदाराचे प्रबोधन करतांना हिंदू |
या निदर्शनाला दादा वैद्य चौक येथून प्रारंभ झाला. चिनी वस्तूंवर बहिष्कार घाला, स्वदेशीचा वापर करा, अशा विविध घोषणा या वेळी देण्यात आल्या. तसेच ५७ लक्ष कोटी रुपयांचे विदेशी कर्ज असतांना फटाक्यांवर प्रतिवर्षी ३ सहस्र कोटी रुपये खर्च करणे हा देशद्रोह या आशयाचे फलकही या वेळी हातात धरण्यात आले होते. प्रारंभी आंदोलनाचा उद्देश सांगताना हिंदु जनजागृती समितीचे श्री. सत्यविजय नाईक यांनी म्हटले की, देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले फटाके मोठ्या प्रमाणात विकले जात आहेत. हे फटाके फोडल्यावर त्यांवरील देवता आणि राष्ट्र्रपुरुष यांच्या चित्रांच्या चिंधड्या उडतात अन् त्या जागोजागी पडलेल्या आढळतात. चिंधड्या उडालेले हे तुकडे अनेकांच्या पायाखाली, केरात, चिखलात, नाल्यांत पडलेले निदर्शनास येतात. त्यामुळे देवतांची विटंबना आणि राष्ट्र्रपुरुषांचा अवमान होऊन कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक अन् राष्ट्र्रीय भावना दुखावल्या जात आहेत. सध्या चिनी फटाकेही बाजारात उपलब्ध आहेत. या फटाक्यांमध्ये विषारी घटकांचे प्रमाण अधिक असते आणि यामुळे ते स्वस्त असले, तरी अत्यंत प्रदूषणकारी आहेत. प्रदूषणकारी चिनी फटाक्यांवर बंदी आहे. अवैधपणे चिनी फटाके विक्री करणार्यांवर योग्य ती कारवाई व्हावी.
शहरात प्रारंभी दादा वैद्य पुतळ्याजवळ, नंतर कॅनरा बँकेसमोर, भवानी सदनासमोर आणि शेवटी वरचा बाजार प्रवेशद्वाराजवळ ही निदर्शने करण्यात आली. या आंदोलनाला लोकांचा चांगला प्रतिसाद लाभला. निदर्शनांना श्री गणपतीचा श्लोक म्हणून प्रारंभ करण्यात आला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. जयेश थळी, धर्माभिमानी श्री. संतोष कापडी, श्री. प्रताप नाईक, श्री. अनंत बोंद्रे, श्री. अशोक प्रभु हे आंदोलनात सहभागी झाले होते. श्री. रमेश नाईक आणि फोंडा येथील हिंदु धर्माभिमानी श्री. मधुसूदन देसाई या हिंदुत्वनिष्ठांनी या वेळी विचार मांडले.
क्षणचित्रे
१. फोंडा येथील किरणामालाचे मोठे व्यापारी रा.व्यं. कुडतरकर अॅण्ड सन्स यांना या वेळी निवेदन देण्यात आले. त्यांनी लगेचच हे निवेदन मागील भिंतीवर चिकटवले. येणार्या सर्व ग्राहकांना मी हे निवेदन वाचण्यास सांगेन. तुमचा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. आमचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे, असे कुडतरकर म्हणाले.
२. एक २० जणांचा गट स्वत:हून आंदोलनात सहभागी झाला.
३. गुप्तचर विभागाचे पोलीस येऊन चौकशी करून गेले.
via Blogger http://ift.tt/2fl5sOi
from WordPress http://ift.tt/2dNgw65
via IFTTT
No comments:
Post a Comment