Latest News

सनातनचे वाचक आणि हितचिंतक श्री. रमेश फडके रायगड भूषण पुरस्कार २०१६ने सन्मानित

श्री. रमेश फडके आणि त्यांच्या पत्नी (उजवीकडे) 
सुनील तटकरे यांच्याकडून पुरस्कार स्वीकारतांना
      पनवेल – वर्ष २०१६ चा रायगड भूषण पुरस्कार येथील सनातनचे वाचक आणि हितचिंतक श्री. रमेश फडक यांना १५ ऑक्टोबर या दिवशी अलिबाग येथे माजी आमदार सुनील तटकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी त्यांच्या समवेत त्यांच्या धर्मपत्नीसुद्धा उपस्थित होत्या. श्री. रमेश फडके हे सामजिक कार्यात मोठ्या प्रमाणात सक्रिय असून नामवंत कलावंतही आहेत. 
      श्री. फडके हे ग्रामपंचायत नेरे येथे सन १९८३ ते १९९२ पर्यंत सरपंच होते. रायगड जिल्हा परिषदेकडून आदर्श सरपंच पुरस्कार सन १९९१-९२ साली त्यांना मिळाला आहे. या माध्यमातून त्यांनी नेरे गावात अनेक विकासकामे करून नेरेवासियांची मने जिंकली.
     एस्.के.एस् चक्षु फाऊंडेशन, मुंबई या संस्थेच्या माध्यमातून आरोग्य शिबिरे भरवणे, विनामूल्य नेत्र चिकित्सा करून गरीब गरजू आदिवासी समाजाची विनामूल्य मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणे, तसेच लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून डोळ्यांच्या विविध विकारांवर विनामूल्य शस्त्रक्रियांचे आयोजन करणे अशा अनेक संस्थांच्या माध्यमातून ते सामाजिक कार्य करत आहेत.
       श्री. रमेश फडके संगीत-भजन क्षेत्रातील प्रसिद्ध कलावंत असून रायगड जिल्ह्यात संगीत-भजनाची परंपरा जपत असतांना अनेक गावांतून कार्यक्रम करून नविन पिढीला भजनाची गोडी लावली आहे. तसेच गावांतून भजन मंडळाच्या आणि अन्य कलावंतांना त्यांनी घडवले आहेत. या माध्यमातून अध्यात्माची, नैतीकतेची महती संतांच्या अभंगातून जनमानसापर्यंत पोचवण्याचे कार्य त्यांनी नि:स्वार्थ वृत्तीने केले आहे.
      सनातन संस्थेचे हितचिंतक असलेले श्री. रमेश फडके हे साप्ताहिक सनातन प्रभातचे वाचक आहेत. साप्ताहिक वाचायला बसलो की, मला अडीच घंटे लागतात. सनातन प्रभातचा अभ्यास करून ती सूत्रे इतरांना सांगतात. गावातील अनेक प्रतिष्ठितांना त्यांनी वर्गणिदार होण्यास उद्युक्त केले आहे. तसेच इतर गावातील परिचयाच्या लोकांचे नाव आणि पत्ते देऊन प्रसंगी दूरध्वनी करून आणि प्रत्यक्ष समवेत येऊनही ते इतरांना संस्थेविषयी सांगतात अन् वर्गणिदार होण्यास सांगतात. 
       सनातनच्या प्रत्येक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. गुरुपौर्णिमा, आंदोलन, धर्मसभा यांना ते उपस्थित असतात, तसेच इतरांनाही सांगतात. सनातनची उत्पादने, ग्रंथ, पंचांग स्वत: घेतात आणि इतरांना उद्युक्त करतात. 
      सनातनवरील बंदीच्या कठीण प्रसंगीही ते संस्थेच्या बाजूने ठाम उभे राहिले आणि इतरांना सकारात्मक सांगत होते. अर्पण देणे, जाहिरातीसाठी इतरांना उद्युक्त करणे, दैनिकाचे विशेषांक प्रायोजित करणे आणि त्याचे समाजात वितरण करणे अशा प्रकारे त्यांचा धर्मकार्यात सहभाग असतो. नेरे येथील एका आश्रमात अंनिसचे शिबिर घेण्याचे नियोजन होते. तेव्हा त्यांनी हिंदु जनजागृती समितीला साहाय्य म्हणून गावात पुढाकार घेऊन बैठकीचे आयोजन केले आणि अंनिसची हिंदु धर्मविरोधी भूमिका सगळ्यांना सांगून नेरे येथील सर्व ग्रामस्थांना हे शिबिर सनदशीर मार्गाने थांबवण्यासाठी आवाहन केले आणि त्यांना समवेत घेऊन त्या आश्रमाला अन् पोलिसांना निवेदन देऊन तेथे जागृती केली. या शिबिराला नेरे गावातून मोठा विरोध झाल्याने आश्रमातील लोकांनी कार्यक्रम न करण्याचे आश्‍वासन द्यावे लागले.

via Blogger http://ift.tt/2eDNHYt




from WordPress http://ift.tt/2dEpHFS
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.