दीवाळी च्या पर्वावर फटाक्यामध्ये हजारो रुपये खर्च होतात. गरीब मुलांना फटाके तर काय शालोपयोगि वस्तु सुद्धा निट मिळत नाही. याची जाणीव घेत सामजिक कार्यकर्ता पाथरगाव ग्रामपंचायत सदस्य, चांदुर रेल्वे कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक हरिभाऊ वसंतराव गवई यांनी स्व.वसंतराव गवई स्मृती प्रीत्यर्थ दिवाळी चे औचित्य साधुन फटाके वर खर्च न करता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथरगाव च्या 49 विद्यार्थ्यांना स्कुल बैग चे वाटप करुन समाज सेवेचे व्रत जपले. फटाके फोडू नये असा सल्ला ही या वेळी गवई यांनी विद्यार्थ्यांना दिला.त्यांच्या या उपक्रमाने तालुक्यात एक चांगला सन्देश गेला आहे. अनेकांनी गवई यांचे कौतुक केले. हा आदर्श सर्वांनी घ्यावा व नाहक खर्च टाळावा.गरीब मुलांना सहकार्य करावे ही काळाची गरज आहे.शाळेत घेतलेल्या एका कार्यक्रमात गावकर्यांच्या उपस्थित बैग चे वाटप करण्यात आले. या वेळी सरपंच दुर्गा जाधव,मोहन राठौड़, नीलेश जाधव, शिक्षक वर्ग,आंगनवाड़ी सेविका, व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
via Blogger http://ift.tt/2e7DELu
from WordPress http://ift.tt/2e7DBze
via IFTTT
No comments:
Post a Comment