चांदूर रेल्वेः/शहेजाद खान /–
अमरावती येथे झालेल्या जिल्हा स्तरिय ६.५ कि.मी. क्रॉसकंट्री रनिंग स्पर्धेत चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला विश्वेश्वर येथील श्रीकृष्ण कनिष्ठ महाविद्यालयाच्या एचएसएसी व्होकेशनलचा विद्यार्थी पंकज रवींद्र भुरले याने व्दितीय क्रमांक पटकविला असुन चांदूर रेल्वे तालुक्याचे नाव रोशन केले आहे.
अमरावती येथील जिल्हा स्टेडियम येथे पार पडलेल्या जिल्हास्तरिय ६.५ कि.मी क्रॉसकंट्री रनिंग स्पर्धेत पंकज रवींद्र भुरले ने दुसरे स्थान पटकविले असुन त्यांची विभागीय स्तरिय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या शिवाय पंकजने १५०० मिटर व ८०० मिटर धावण्याच्या स्पर्धेत तृतीय स्थान पटकविले. यापूर्वी पंकज भुरले चांदूर रेल्वे येथे झालेल्या तालुका स्तरिय १५०० व ८०० मिटर रनिंग स्पर्धेत अजिंक्य ठरला होता. तसेच संकेत रवींद्र भुरले ४०० मिटर रनिंग स्पर्धेत, अनिकेत भारत शिंगाडे हा ५ कि.मी.क्रॉसकंट्री रनिंग स्पर्धेत अव्वल आले होते. श्रीकृष्ण कनिष्ठ महाविद्यालयात १२ वी एचएससी व्होकेशनलमध्ये शिकणारे पंकज भुरले, संकेत भुरले, अनिकेत शिंगाडे व रोहित भलावी यांनी ४०० मिटर रिले रनिंग स्पर्धेत अव्वल स्थान पटकविले होते. या सर्व विद्याथ्र्यांचा प्राचार्य सुरेश देवळे, पर्यवेक्षिका भारती अवधुतकर यांनी पुष्पगुच्छे देऊन कौतुक केले. या यशाबद्दल त्यांच्यावर सर्वत्र कौतुकांचा वर्षाव होत आहे.
via Blogger http://ift.tt/2dK3LV1
from WordPress http://ift.tt/2f7eG0Z
via IFTTT
No comments:
Post a Comment