Latest News

न प निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकिय नेते एकाच व्यासपिठावर संतनगरी चा विकाससाठी सर्वच प्रयत्नशील

    शेगांव:- (मनोज वर्मा) समिर देशमूख सह महेद्र मिश्रा   

     राजकिय नेतामंडळी एरव्ही सबकूछ हम च्या अविर्भावात समाजात वावरतांना दिसतात.मात्र आगामी न प निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मागील काळात केलेल्या प्रयत्न,पाठपूरावा तसेच विकास कामाचा आढावा आणि या निवडणूकमध्ये आपल्या पक्षाचा काय अजेंडा ,भूमिका काय राहील यावर प्रकाश टाकण्यासाठी एकाप्रकारे जनता की अदालत सारख्या परीसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करणे आवश्यक असतात मात्र हे   सर्व घडवून आणले संतनगरी तील पत्रकार महेद्र मिश्रा,मनोज वर्मा,नानाराव पाटील व समिर देशमूख यानी
          स्थानिक सप्तश्रृंगी देवी संस्थानच्या प्रांगणात २३ आक्टोबर रोजी संध्याकाळी सद्गूूरू मल्टीपरपज फॉऊडेशन व प्रिंट तसेच ईलेक्ट्रानिक्स मिडीया च्या वतीने न प निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ‘आपले गांव आपला अजेंडा ‘ अतंर्गत परीसंवाद व चर्चा कार्यक्रम घेण्यात आला ,याप्रंसगी व्यासपिठावर नगर विकास आघाडीचे ञानेश्वरदादा पाटील,राष्ट्रवादीच्या सौ शैलजाताई मोरे,भाजपाचे डॉ मोहन बानोले व नगरसेवक राजू वाघ, शिवसेनेचे अविनाश दळवी व संतोष घाटोळ,कॉग्रेसचे शैलेषदादा पाटील व डॉ असलम खान,मनसेचे अमित देशमूख व विनोद टिकार,प्रहारचे निलेश घोंगेव यूवराज देशमूख आदि उपस्थित होते.
    या कार्यक्रमासाठी निरीक्षक म्हणून दै देशोन्नतीचे आवृती संपादक राजेशजी राजोरे,दै लोकमत चे उपसंपादक अनिलजी गवई,एबीपी माझाचे जिल्हा प्रतिनिधी संदिपजी शुक्ला व दैनिक भास्करचे जिल्हा प्रतिनिधी ईश्वरसिग ठाकूर हे होते.
    सूरवातीला पत्रकारांनी व आयोजकांनी काढलेले ३५ प्रश्न या चर्चदरम्यान उपस्थित नागरीक व पत्रकार तसेच निरीक्षकांकडून  विचारण्यात आले.त्याची उतरे काही नेत्यानी समर्पक दिली तर काहीनी असमाधानकारक उतरे दिली . ञानेश्वरदादा यानी आपसातील वाद संपू शकतात असा आशावाद व्यक्त केली तद्नतर जनतेतून थेट प्रश्न विचारण्यात आले,रखडलेला विकास आराखडा,शहर स्वच्छता,आरोग्य,शिक्षण दर्जा,अपात्रता प्रकरण,शहरात द्वेषभावनेतून असलेले राजकारण यावर प्रश्न विचारली गेली ,आगामी काळात चूका सूधारून जनहिताची विकास कामे करण्याचेही मानस सर्व नेत्यानी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे संचालन महेद्र मिश्रा,अमोल सराफ,नानाराव पाटील,मनोज वर्मा यानी तर आभार प्रदशन गजानन कलोरे यानी केली .मंचावर उपस्थित निरीक्षक व नेत्याचे स्वागत पूष्पगूच्छ देवून करण्यात आले
उत्कृष्ठ प्रश्नकर्ताचा सत्कार
कार्यक्रमात थेट प्रश्नामधून काही प्रश्नाची निवड करण्यात आली त्याचा निरीक्षक च्या हस्ते सन्मान करण्यात आली यामध्ये पत्रकार नितीन घरडे व कू पलक विश्वेश्वर पाटील याचा तसेच कार्यक्रमासाढी सहयोग करणारे सप्तश्रृंगी संस्थानचे अरूण भटकर व उत्कृष्ठ निवेदक म्हणून अमोल सराफ यानाही स्मृती चिन्ह प्रदान करण्यात आले
परीक्षक राजेशजी राजोरे आणली रंगत
या परीसंवाद मध्ये राजकिय नेत्यानी अनेक प्रश्नाची उत्तरे उडवा उडवीची देत असताना परीक्षक राजेशजी राजोरे यानी त्याना खेळीमेळीचे वातावरण तयार करीत उत्तरे देण्यात परावृत करीत होते,या दरमान्य त्यानी शेरो शायरी करीत पत्रकाराची भूमीका व नेत्याकडुन जनतेस काय हवे याचे ही विवेचन केले

via Blogger http://ift.tt/2dN8yVL




from WordPress http://ift.tt/2eTdP0o
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.