Latest News

सात जिल्हातील १५ ते २० लाख मुस्लिम बांधव मतदानाला मुकणार ?


विदर्भ ब्युरो चिफ- (शहेजाद खान)-

मुस्लिम बांधवांचा धार्मिक विश्‍वस्तरीय मेळावा

राज्य मुख्य निवडणूक आयोगाने नगरपालिका तसेच नगर परिषद निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. त्याक्षणी मुस्लिम समुदायातील असंख्य बांधवांना मतदानाचा अधिकारच हिरावूनच घेतल्याचा धक्का बसला.  निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या तारखांप्रमाणे २७ नोव्हेंबर रोजी अर्थातच पहिल्या टप्प्यात सात जिल्ह्यातील एकूण ४५ न.प.च्या निवडणुका घेण्यावर आयोगाने शिक्कामोर्तब केले. आयोगाच्या निर्णयावर जराही दुमत नाही. मात्र, मुस्लिम बांधवांचा धार्मिक विश्‍वस्तरीय मेळावा मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथे २६ ते २८ नोव्हेंबर दरम्यान होत असल्यामुळे राज्यात होऊ घातलेल्या न.प. निवडणुकांपासून १५ ते २० लाख मुस्लिम बांधव आपल्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहणार असल्याचे धक्कादायक चित्र पहावयास मिळत आहे. आयोगाचा हा निर्णय ‘राजकीय की प्रशासकीय’ हा मुद्दा दुय्यम असला तरी लाखो मुस्लिम बांधव मतदानापासून वंचित राहतील, मात्र वास्तविकताच म्हणावी लागेल.
मुस्लिम समाजामध्ये अनेक संघटना आहे. ज्या धार्मिक, राजनैतिक, शैक्षणिक, सामाजिक स्तरावर काम करतात. यापैकीच एक धार्मिक संघटना तब्लिगी जमात या नावाने प्रचलित असून ही संघटना भारतातच नव्हे तर विश्‍वस्तरावर तब्लिगी जमात या नावाने विश्‍वविख्यात आहे. या संघटनेचा मुख्य उद्देश मुस्लिम समाजसुधार आणि शैक्षणिक बदल तसेच इतर मुद्यांवर जागृती निर्माण करणे हा होय. इतर देशांप्रमाणेच भारतात सुध्दा राज्य तसेच जिल्हा पातळीवर ही संघटना मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे २६ ते २८ नोव्हेंबर दरम्यान विश्‍वस्तरीय धार्मिक मेळावा ‘आलमी तब्लिगी इज्तेमा’ चे आयोजन करते. चार महिन्यापूर्वी या कार्यक्रमाच्या आयोजनाची रूपरेषा तयार होत असल्यामुळे निश्‍चित झालेल्या तारखांमध्ये बदल होणे अपेक्षित नाही. मात्र, निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणुकीच्या तारखांमध्ये बदल अपेक्षित असल्यामुळे निवडणूक आयोगाने मुस्लिम बांधवांची धार्मिक व मतदान अधिकाराची गुंफलेली साखळी सोडविण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाने करावा, अशी भावना मुस्लिम बांधवांकडून व्यक्त केल्या जात आहे. २७ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील न.प. निवडणुकांमध्ये अमरावती जिल्ह्यासह ७ जिल्ह्यातील एकूण ४५ न.प. च्या निवडणुका होणार असल्यामुळे १५ ते २० लाख मुस्लिम बांधव मतदानाला मुकणार आहे. भोपाळ येथील मुस्लिम विश्‍वस्तरीय मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी लाखो बांधव २५ नोव्हेंबरलाच भोपाळकडे प्रस्थान करणार असल्यामुळे सातही जिल्ह्यातील चारचाकी, रेल्वे, बस यासह इतर वाहनांची मोठय़ा प्रमाणात आधीच बुकिंग करण्यात आलेली आहे. त्यामुळे आयोगाने निवडणूक घेण्याच्या तारखांमध्ये फेरबदल करून मुस्लिम बांधवांना आपला अधिकार मिळवून द्यावा, अशी मागणी असंख्य मुस्लिम समुदायाकडून होत असल्याचे दिसून आले.
निवडणूक आयोगाच्या निर्णयावरच प्रश्न
निवडणुकांचा आजपर्यंतचा इतिहास पडताळून पाहता मुस्लिम बांधवांचे सर्वाधिक मताधिक्य हे काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांकडे असल्यामुळे येणार्‍या न.प. निवडणुकांच्या जाहीर केलेल्या तारखा या प्रशासकीय नसून राजकीय असल्याचे मुस्लिम बांधवाकडून बोलल्या जात आहे. भोपाळमध्ये होत असलेल्या मुस्लिमांच्या विश्‍वस्तरीय मेळाव्याला मुस्लिमांची उपस्थिती प्रार्थनीय असल्याचे पाहून याच दरम्यान होऊ घातलेल्या निवडणुकांचा सर्वस्वी फायदा हा इतर पक्षाला होणार हे अपेक्षित धरून निवडणूक आयोगाने हा निर्णय तर घेतला नसावा, अशी अपेक्षा मुस्लिम बांधवांकडून सातत्यपूर्ण व्यक्त केल्या जात आहे.
फोटो – संग्रहित छायाचित्र 

via Blogger http://ift.tt/2fbBWdz




from WordPress http://ift.tt/2eCgHye
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.