आज भाऊबीज…बंधू-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा दिवस…भावा-बहिणीच्या नात्यातील गोडवा वाढवणारा दिवस…दरवर्षी अश्विन वद्य द्वितीयेला यमद्वितीया म्हणून संबोधलं जातं. भावा बहिणीतील नात्यातल्या ओलावा साजरा करण्यासाठी घराघरातून भाऊबीज मोठ्या आनंदात साजरी केली जाते.
मृत्यूचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यम आणि त्याची बहीण यमी यांच्यातील भाव बंधाच्या पुराण कथेला स्मरुन आजचा दिवस साजरा करण्यात येतो.
पूर्वीच्या काळी दिवाळीच्या निमित्ताने वर्षातून एकदाच सासरी गेलेल्या बहिणीच्या घरी जाऊन तिची विचारपूस केली जात असे. या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण पहिल्यांदा चंद्रकोरीला आणि नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीच्या ताटात ‘ओवाळणी’ देऊन बहिणीचा सत्कार करतो..
via Blogger http://ift.tt/2eOv1Gg
from WordPress http://ift.tt/2f73pKF
via IFTTT
No comments:
Post a Comment