पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू |
१. खोटा खटला पूज्य बापूंच्या नावे थोपवण्याचा विरोधकांचा डाव :षड्यंत्रकर्त्यांच्या आहारी गेलेला भोलानंद गुप्ता याने १६.३.२०१६ या दिवशी साक्षीदारांवर होत असलेल्या आक्रमणांमागील रहस्य उघडकीस आणतांना सूरत येथे सहस्रो लोकांसमक्ष येऊन म्हटले होते, षड्यंत्रकर्ते असे म्हणाले होते, गुप्ताजी ! पहा, तुम्ही फसलात किंवा आमच्यापैकी कुणीही पकडला गेला, तर आपण एकमेकांना गोळी मारू किंवा चाकूने वार करू. असे काही करून घेऊ अथवा करवू. मग आपण खटला बनवू आणि बापूंच्या नावे थोपवू, असा त्यांचा पूर्ण डाव होता. (व्हिडिओची यूट्यूबवरील लिंक – goo.gl/daQ3Tp) त्यांचा हा डाव सर्वजण पहातच आहेत.
२. साक्षीदारांच्या हत्या होण्यामागे बापूजींचे शत्रू ! : दैनिक जागरणमध्ये २६.७.२०१५ या दिवशी प्रसिद्ध झाले होते, कृपाल सिंह हत्या प्रकरणात आरोपी नारायण पांडे याने पोलिसांचे म्हणणे पूर्णतः खोडून काढले. त्याने सांगितले की, आसारामजी बापू कारागृहाच्या बाहेर येण्याचे दिवस जवळ आले होते. अगदी त्याच्याआधीच कृपालची हत्या करण्यात आली. यापूर्वीसुद्धा जामीन मिळण्याची स्थिती आल्यावर एका साक्षीदाराची हत्या करण्यात आली होती. यावरून स्पष्टच आहे की, बापूंचा कोणीतरी शत्रू संधीचा लाभ घेत आहे.
(संदर्भ : मासिक ऋषी प्रसाद, ऑगस्ट २०१५)
via Blogger http://ift.tt/2dMh5s5
from WordPress http://ift.tt/2fhuzkR
via IFTTT
No comments:
Post a Comment