बैठकीला उपस्थित हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी |
चेन्नई – हिंदु राष्ट्र स्थापनेचे लक्ष्य समोर ठेवून त्यासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याच्या उद्देशाने तमिळनाडूतील २७ हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी चेन्नई येथे नुकतीच एक बैठक घेतली. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संघटितपणे प्रयत्न करण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला.
हिंदु जनजागृती समितीच्या सौ. उमा रविचंद्रन् यांनी प्रारंभी दीपप्रज्वलन केले. त्यानंतर जिहाद्यांकडून हत्या करण्यात आलेल्या हिंदु नेत्यांना श्रद्धांजली वहाण्यात आली. या वेळी सौ. उमा रविचंद्रन् यांनी सनातन धर्मराज्य म्हणजेच हिंदु राष्ट्र स्थापण्यामागची आवश्यकता विशद केली. हे दैवी कार्य असून त्यासाठी आपण पात्र होणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्यातील राग, मत्सर यांसारखे दोष आणि अहं नष्ट करणे आवश्यक आहे, असे सौ. रविचंद्रन् यांनी सांगितले.
via Blogger http://ift.tt/2f1eKf9
from WordPress http://ift.tt/2frVDxJ
via IFTTT
No comments:
Post a Comment