Latest News

*आम्ही सारे फाउंडेशन व जयसेवा सामाजिक संस्थेचे संयुक्त विद्यमाने विसावा वृध्दाश्रम चांदूरबाजार रोड, अचलपूर येथे साहित्य वाटप*

अचलपुर:-प्रमोद नैकेले /–




अचलपुर तालूक्यातील चांदूर बाजार रोडवर असलेल्या *विसावा वृध्दाश्रमात* काल23 आँक्टोंबर रोजी आम्ही सारे फाउंडेशन व जयसेवा सामाजिक संस्थेचे संयुक्त वीद्यमाने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
       अँडव्होकेट भास्करराव कौतीककर व पुंडलीकराव भुजाडे यांचे तर्फे चांदुर बाजार रोडवर चालवण्यात येणा-या विसावा वृध्दाश्रमात अमरावती येथील आम्ही सारे फाउंडेशन व जयसेवा सामाजिक संस्थेचे कार्यकर्त्यांनी भेट देवून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले याप्रसंगी आकाश देशमुख,स्नेहा जटाळ,ममता गोहाळ,प्रज्वल वंजारी,जयंत सोनोने,अनील दलाल,
हरीश पोके यांनी वृध्दाश्रमास गहू,तांदूळ,तुरदाळ,फँन,साबन,उटणे,बिस्किटे,ताट व इतर साहित्य दिले तसेच गुलाबजामुन वाटपकरून वृध्दांचे आशिर्वाद घेतले.अँड.भास्करराव कौतीककर यांनी आभार मानून वृध्दाश्रम निर्मीतीबाबत आपली संकल्पना स्पष्ट केली.आज येथे 18 वृध्दांना विसावा देवून आपल्या मनाला खूप शांतता मिळत आहे असे म्हटले तसेच गजानन जंवजाळ संत गाडगेबाबा सेवाधर्म समीती यांनी मानव सेवा हिच ईश्वरसेवा आहे असे प्रतिपादन केले.याप्रसंगी संजय आमले,अन्नासाहेब बिडवाईक,मिलींद काळबांडे,सिध्दांत 
आठवले यांनी आपल्या शुभेच्छा वृध्दाश्रमास दिल्या.प्रमोद शेळके यांनी ज्या वयात खेळण्याबागडण्याचे दिवस
असतांना आकाश देशमुख,ममता गोहाळ,स्नेहा जटाळ,जयंत सोनोने व प्रज्वल वंजारी यांचे सारखे तरूण मुलामुलींनी वृध्दाश्रमात येवून मातापितातूल्य वृध्दांना मदत करणे कौतुकास्पद आहे.अँड.कौतीककर यांनी हा वृध्दाश्रम बनवतांना आलेल्या अडचणी सांगतांना कामुनीबाई ढोकणे या वृध्द महीलेचे विशेष आभार मानले कारण करोडो रुपयांची मालमत्ता असणारी ही वृध्दा समाजाच्या आजच्या प्रवृत्तीला कंटाळून बेसहारा परिस्थितीत येथे आल्या व त्यांनी त्यांचे कडे असलेल्या शेताला विकून त्यांचे वडिल चंद्रभानजी रामाजी भगत यांचे स्मृति प्रीत्यर्थ वृध्दाश्रमास एक हाँल बांधून दिला व स्वता येथेच राहतात.कामीनीबाई ढोकणे यांनी सुध्दा याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.संत गाडगेमहाराज तक्रार निवारण समिती चे अध्यक्ष प्रमोद नैकेले यांनी सुध्दा याप्रसंगी दोन्ही संस्था व वृध्दाश्रमाचे संचालक यांना त्यांच्या स्तुत्य उपक्रमाच्या शुभेच्छा दिल्या तसेच आकाश देशमुख,ममता गोहाळ,स्नेहा जटाळ,जयंत सोनोने,प्रज्वल वंजारी या तरूण पिढीचे कौतुक करुन परिवर्तन ही युवाशक्तीच घडवून आणू शकते याचे सोबत आपण आपली सामाजिक संस्था सदैव राहील असे आश्वासन दिले.आम्ही सारे फाउंडेशनच्या सर्व पदाधिकारींनी ही सेवा करण्याची आम्हाला संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आश्रमाचे व जयसेवा सामाजिक संस्थेचे आभार मानले.

via Blogger http://ift.tt/2eJA74D




from WordPress http://ift.tt/2eyELSq
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.