रायगड /माणगाव /—
कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी देण्यात यावी, मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशा अनेक मागण्यांसाठी राज्यभरातून मराठा समाजाच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात येत आहे त्यातच आज
मराठा क्रांती मोर्चाचं वादळ कोकणात दाखल झाल कोकणातील मराठा समाजही रायगड चा माणगाव मध्ये एकत्र आला – रायगडच्या माणगाव जवळील निजामपूर रोडवरुन या मोर्चाची सुरुवात झाली यावेळी मोर्चात मराठ्यांची तुफान गर्दी पाहायला मिळाली अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या मोर्चाचा शेवट झाला. मराठ्यांचे निघत असलेले मोर्चे इतिहास घडवत आहे, परिवर्तन होत आहे. अनोळखी चेहऱ्याचे मराठा तरुणाईचे सामूहिक नेतृत्व, अत्यंत शिस्तप्रिय, गडबड-गोंधळ नाही, शांतता, संयम, सुनियोजीत, वेळेचे भान, लाखोंचे संख्येवर नियंत्रण, जिजाऊंची लेकींची, महिलांची संख्याही पुरुषांच्या एवढी . अॅम्बुलंस, महिला, यांचेसाठी क्षणात केलेला कॉरोडॉर , सूचनांचे काटेकोर पालन करणारा , स्वखर्चाने जमलेला मराठा , अशा अनेक प्रशंसा कराव्या तितक्या थोड्याच.
via Blogger http://ift.tt/2ejBI2T
from WordPress http://ift.tt/2euHGQw
via IFTTT
No comments:
Post a Comment