पंढरपूर – सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांचा अवमान केल्याविषयी येथील पत्रकार श्री. द्वैपायन वरखेडकर यांनी महाराष्ट्र १ वाहिनीचे संपादक निखिल वागळे यांना पत्र पाठवून निषेध केला आहे. या निषेधपत्रात श्री. वरखेडकर यांनी लिहिले आहे, अन्य वाहिन्यांप्रमाणे मी महाराष्ट्र १ या वृत्तवाहिनीचाही नियमित प्रेक्षक आहे.
१८ ऑक्टोबर या दिवशी रात्री आजचा सवाल या कार्यक्रमात सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांना त्यांचे मत मांडण्यासाठी आपण बोलावले होते. त्या वेळी श्री. अभय वर्तक हे स्वत:चे मत-विचार मांडत असतांना अचानक आपण आक्रस्ताळेपणा करीत त्यांना येथून निघून जा, येथून पुढे सनातनच्या लोकांना मी बोलावणार नाही इत्यादी प्रकारची अनेक चुकीची वाक्ये बोलून अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली. त्यांना विचार पूर्णपणे मांडण्याची संधी न देताच त्यांना हाकलून दिले. ही गोष्ट शिष्टाचाराला आणि सुसंस्कारितेला धरून नाही. एका पत्रकारासाठी तर हे कृत्य फारच अशोभनीय आणि चुकीचे आहे. पत्रकाराकडून अशी वागणूक अपेक्षित नाही. मी स्वत: एक पत्रकार असून पत्रकाराने लोकांशी असे वागण्यास माझा आक्षेप आहे.
श्री. वरखेडकर यांनी निषेध करतांना पुढे लिहिले आहे, तुमच्यासारखे पत्रकार संपूर्ण पत्रकारितेला कलंक आहेत. आपण श्री. अभय वर्तक यांची त्वरित क्षमा मागावी आणि येथून पुढे असे वागू नये. अन्यथा पत्रकार म्हणून काम करण्याचा आपणाला अधिकारच नाही, असे मी समजतो.
via Blogger http://ift.tt/2eCxqAD
from WordPress http://ift.tt/2esBHY5
via IFTTT
No comments:
Post a Comment