अचलपूर नगरपालिकेचा कम्पोज डेपो रासेगाव रस्त्यावर आहे येथे शहरातील घनकचरा साठवला जातो त्याला आग लागली.
अचलपूर शहरातील नगरपालिकेने करोडो रुपये खर्च करून रासेगाव रस्त्यावर कम्पोज डेपो तयार केला.येथे शहरातील हजारो टण घनकचरा गोळा करून त्याचे कम्पोज खत बनवल्या जाणार होता.मोठ्या धूमधडाक्याने याचा शुभारंभ झाला परंतू प्रशासनाचे दुलर्क्षाने हा डेपो केवळ शहरातील कचरा जमा करण्याचे ठीकाण झाले.घनकच-यातील प्लस्टीक पिशव्या व कागद वेगळे करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी येथे शेख मोहसीन या कर्मचा-याची नियुक्ति करण्यात आली आहे.त्या वेगळ्या करण्याऐवजी त्यांना आग लावून दिल्या जाते असे येथील शेतक-यांनी सांगितले असेच काही दिवसांपूर्वी या कच-याला आग लावली असावी व तीने काल 23 आँक्टोंबरला उग्र स्वरूप धारण केले.या डेपोच्या आसपास निकेश दाभाडे,किशोर गोमासे,जिराफे,प्रफुल महाजन व इतर शेतकरी बांधवांचे शेत आहेत.शेतात केळी,ज्वारी,तुर व इतर पीक आहेत शिवाय संत्रामंडी व गोपी ढाबा सुध्दा आहे.आगीमुळे शेतातील पीकांना नुकसान होवू नये म्हणून सर्व शेतक-यांनी घटनास्थळी धाव घेतली नगरपालिकेच्या अग्नीशामक दलाला दूरध्वनीवरून घटनेची माहिती दिली पण जवळपास एक तास अग्नीशामकची गाडी तेही अर्धवट भरलेली आली.या घटनेची माहिती मुख्याधिकारी यांना सुध्दा व्हाटस्अपवरून देण्यात आली नंतर दुसरी गाडी पोहचली
व आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला.कम्पोजर शेख मोहसीन याला सुध्दा घनकचरा कर्मचा-याने कळविले मात्र तो घटनास्थळी पोहचला नाही अशा बेजबाबदार कर्मचा-याचे आधीन डेपो ची जबाबदारी सोडून शेतकरी व नागरिकांना संकटात सोडणा-या नगरपालिका प्रशासनाबद्दल येथील शेतकरी वर्गात तिव्र संताप दिसत होता.प्रफुल महाजन नगरसेवक याचे हि डेपोला लागून आहे त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत येथे करोडो रुपयांचा भ्रष्टाचार होत आहे याबाबत मी अनेक तक्रारी केल्या पण दखल घेतली जात नाही.या डेपो कडे जाणारा रस्ता बनवून देण्याचे आश्वासन तत्कालीन मुख्याधिकारी यांनी दिले होते मात्र यावर आजपर्यंत कोणतीच कार्यवाही झाली नाही त्यामुळे शेतातील कामे करण्यास अडचणी येतात.आमच्या शेतात ट्रँक्टर शिवाय कोणतीच वाहने जाउ शकत नाही.करोडो रुपये खर्च करून बांधलेल्या या डेपोतून बोअर,इलेक्ट्रीक मशीन,खिडक्या,व साहित्य चोरीला जात आहे परंतू प्रशासनला कहीच फीकीर नाही जनतेच्या पैशाची अशी उधळण करून त्यांनाच संकटात लोटणा-या नगरपालिकेविरूध्द आपण न्यायालयात धाव घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.निकेश दाभाडै,किशोर गोमासे व रंगराव वाठ यांनी आपल्या प्रतिक्रिया देतांना अशा हलगर्जीपणा मुळे शेतातील पीकांचे नुकसान झाल्यास नगरपालिका प्रशासन जबाबदार राहील असे त्यांनी म्हटले तसेच हे प्रकार वारंवार होत असल्याचे सुध्दा त्यांनी सांगितले म्हणून प्रशासनाने येथे चौकीदार ठेवावा,या आग लागण्याची चोकशी करून दोषी वर कारवाई करण्यात यावी अन्यथा हा डेपोच येथून त्वरीत हलवावा अशी मागणी शेतक-यांनी केली आहे.
via Blogger http://ift.tt/2ewClq4
from WordPress http://ift.tt/2emUlFp
via IFTTT
No comments:
Post a Comment