कोल्हापूर येथे हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने हिंदुत्वनिष्ठांची बैठक
बैठकीत उपस्थित हिंदुत्वनिष्ठ |
कोल्हापूर – येथील पद्माराजे गर्ल्स हायस्कूल येथे ११ नोव्हेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सभेच्या प्रसाराची दिशा ठरवण्यासाठी २५ ऑक्टोबर या दिवशी येथील शाहूपुरी, कुंभार गल्लीमधील श्री पंचमुखी गणेश मंदिर विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला २५ हून अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि धर्माभिमानी उपस्थित होते. या वेळी हिंदु धर्मजागृती सभा यशस्वी करण्यासाठी शहर आणि ग्रामीण भागात बैठक घेऊन जोरदार प्रसार करण्याचा निर्धार हिंदुत्वनिष्ठांनी बैठकीत केला. या बैठकीत अनेक रणरागिणींनी धर्मसभेच्या प्रसारकार्यात अधिकाधिक वेळ देणार असल्याचे सांगितले.
via Blogger http://ift.tt/2fcyRur
from WordPress http://ift.tt/2dNjSGd
via IFTTT
No comments:
Post a Comment