Latest News

अभय वर्तक यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करण्यासाठी अवामी लीग पार्टीचे अश्रफअली वांकर आणि त्यांचे सहकारी यांचा सांगली पोलिसांवर दबाव !

सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी महाराष्ट्र 
१ या वाहिनीवरील चर्चासत्रात केलेल्या वक्तव्याचे प्रकरण

         सांगली – सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी महाराष्ट्र १ या दूरचित्रवाहिनीवरील चर्चासत्रात केलेल्या वक्तव्याचे भांडवल करून त्यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करण्यासाठी अवामी लीग पार्टीचे अश्रफअली सलीम वांकर आणि अन्य लोक यांनी सांगली ग्रामीण पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. श्री. वर्तक यांच्यावर गुन्हा प्रविष्ट झाला पाहिजे, यांसाठी वांकर आणि त्यांचे सहकारी २० ऑक्टोबर या दिवशी दिवसभर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मारून बसले होते. अशा प्रकारे एखाद्या वक्तव्यावर गुन्हा प्रविष्ट होत नाही, असे सांगूनही ते ऐकण्यास सिद्ध नव्हते. शेवटी पोलिसांनी सदर प्रकरणी योग्य तो कायदेशीर सल्ला आणि वरिष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शन घेऊन लवकर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे, असा उल्लेख करून त्यांना तक्रारीच्या अर्जावर पोच दिली. 
         वांकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मी बुधगाव येथे रहाणारा असून १९ ऑक्टोबर या दिवशी महाराष्ट्र १ न्यूज वाहिनी पहात असतांना सदर चर्चासत्रात उपस्थित असलेले अभय वर्तक यांनी ज्या वेळी आझाद मैदानावर दंगे झाले, त्या वेळी मराठा पोलीस महिलांवर मुसलमानांनी बलात्कार केले, अशा प्रकारचे वक्तव्य जाणीवपूर्वक आणि पूर्वग्रहदूषितपणे केले. यामुळे माझ्यासह मुसलमान बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. या वक्तव्यामुळे मुसलमान आणि मराठा समाज यांच्यात तेढ अन् द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे त्यांच्यावर भारतीय दंड संहिता २९५ अ आणि १५३, तसेच इतर अन्य कलमांनुसार गुन्हा प्रविष्ट करून कायदेशीर कारवाई करावी. 
         या वेळी शेरूभाई सौदागर, करीम मेस्त्री, असिफ बावा, रजाक नाईक, नालबास मुल्ला, अज्जू पटेल, लालू मेस्त्री, अकबर शेख, इमरान जमादार, उमर गवंडी, जमीर सनदी, आक्रम शेख, इकबाल खान, फारूक मुल्ला यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. 
         गुन्हा प्रविष्ट होण्याची मागणी करणार्‍यांमध्ये सामाजिक कार्यकर्ते असीफ बावा यांचा समावेश होता. बावा यांच्यावर काही दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक कार्यालयावर बेकायदा जमाव जमवून मोर्चा काढल्याच्या प्रकरणी गुन्हा प्रविष्ट आहे.

via Blogger http://ift.tt/2e951nx




from WordPress http://ift.tt/2egNH3A
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.