Latest News

राजीव गांधी जीवनदायी योजनेचा २४५ रूग्णांनी घेतला लाभ – माझी माय हॉस्पीटलमध्ये घेत आहे रूग्ण या योजनेचा लाभ.

चांदुर रेल्वे- (Shahejad Khan)-


शहरातील बायपास रोड, संताबाई यादव नगर येथील माझी माय मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटलमध्ये राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत ८ महिन्यांत जिल्हातील तब्बल २४५ रूग्णांनी मोफत लाभ घेतल्याची माहिती मिळाली आहे.
             राज्यातील दारिद्रयरेषेखालील (पिवळी शिधापत्रिका धारक) आणि दारिद्र्यरेषेवरील (केशरी शिधापत्रिका धारक) कुटुंबांना अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने महाराष्ट्र राज्य सरकारने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली आहे. अशा कुटुंबांना अधिक दर्जेदार वैद्यकीय सेवा प्राप्त होण्याच्या दृष्टीने ही योजना उपयुक्त ठरली आहे. चांदुर रेल्वे शहरातील माझी माय मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटलमध्ये ८ महिन्यामध्ये अमरावती, चांदुर रेल्वे, दर्यापुर, अंजनगाव सुर्जी, परतवाडा, चांदुर बाजार, मोर्शी आदी तालुक्यांतील तब्बल २४५ रूग्णांनी लाभ घेतला आहे. यामध्ये काहींवर दुर्बीनव्दारे अवघड शस्त्रक्रीया ही या योजनेंतर्गत केली.
      या माझी माय हॉस्पीटलमध्ये न्युरोसर्जन म्हणुन डॉ. संदिप इरटवार, डॉ. संदिप वाघ, डॉ. निखील चांदुरकर, डॉ. अश्लेश चौधरी, डॉ. अभिजीत ढाले, तसेच क्रिटीकल केअर डॉ. सलाउद्दीन पटेल, स्त्रीयांकरीता डॉ. आयशा पटेल आदी डॉक्टर आरोग्य जीवनदायी योजनेंतर्गत उपचार घेत असलेल्या रूग्णांच्या सेवेकरीता उपलब्ध आहे.

via Blogger http://ift.tt/2dOGwJC




from WordPress http://ift.tt/2dOHCF7
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.