येथील जून्या आरटीओ मैदानातून या भव्य मूकमोर्चाला प्रारंभ होणार आहे. या मैदानात येणार असलेल्या मोर्चेकरांकरिता विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. ती व्यवस्था पूर्णत्वास आली आहे. ‘एक मराठा, लाख मराठा’ या उद्घोषाने गत महिनाभरापासून जिल्ह्यात मराठा-कुणबी क्रांती मूकमोर्चाची तयारी केली. आयोजकांकडून केलेल्या या तयारीचे फलित रविवारी वर्धेकरांना प्रत्यक्ष बघायला मिळणार आहे. ऐतिहासिक ठरणार्या या मोर्चाचे दृश्य डोळ्यात साठविण्याकरिता वर्धेकर आसूसले आहेत. याकरिता वर्धानगरीही सज्ज झाली आहे. महिलांच्या नेतृत्त्वात पार पडणार्या या मूकमोर्चात सहभागी होणार्यांना कुठलाही त्रास होणार नाही यासाठी पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे.
वर्धेतील जुन्या आरटीओ मैदानातून दुपारी १२ वाजता या ऐतिहासिक मूकमोर्चाला प्रारंभ होणार आहे. या मैदानावर नागरिकांकरिता विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
– त्यांचा मोर्चाची एक tag लाईन म्हणजे “आता एकच चर्चा वर्धेचा मोर्चा” अशी महत्वाची लाईन त्यांनी ठेवली आहे . खर तर वर्धा हे अगदी महत्वाचा शहरांचा आजू बाजूला पडत अस्ल्यामुळे इतर जागेवरून देखील मराठा बांधव वर्धा पोहोचतील अशी शक्यता आहे. रविवार असल्यामुळे मोर्चाला जास्त प्रमाणात गर्दी राहील स्थानिक RTO ग्राउंड चा RTM विद्यापीठ समोरील ग्राउंड वर हा मोर्चा ची सुरवात होईल. सर्व समाज बांधवानी या मोर्चात सहभागी व्हाव्ये अशी आयोजकांनी विनंती केली आहे
#MarathaKrantiMorcha
#MarathaKrantiMorchaवर्धा
via Blogger http://ift.tt/2eU82Lq
from WordPress http://ift.tt/2dZgPXB
via IFTTT
No comments:
Post a Comment