Latest News

नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी संपूर्ण सहकार्य -श्री हंसराज अहीर (केंद्रीय गृहराज्यमंत्री )


अग्नीपंख उपक्रमांतर्गत मदतीचे वाटप




गडचिरोली/ रंगय्या रेपाकवार 

/—-
 नक्षलवादाचे फलित शुन्य आले असून याला चळवळ म्हणणाऱ्यांनी बाहेर पडून मुख्य प्रवाहात यावे  यासाठी मी आवाहन करतो.  नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी रक्षा मंत्रालय सर्वोतोपरी मदत करेल असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री   हंसराज अहीर यांनी आज केले.
अहेरी येथे प्राणहिता पोलिस मुख्यालय येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.  पोलिस अधीक्षक कार्यालय गडचिरोली तसेच आदर्श मित्रमंडळ व इतर स्वयंसेवी सामाजिक संस्थांतर्फे आयोजित “अंग्नीपंख “कार्यक्रमात ते बोलत होते. 
या कार्यक्रमास गडचिरोलीचे पालकमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम, खासदार अशोक नेते, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, सीआरपीएफ 9 व्या बटालीयनचे उपकमांडर पवनकुमार, 370 व्या बटालियन सेकंड  कमांडर जितेंद्र कुमार, उपविभागीय अधिकारी राममूर्ती, आदर्श मित्रमंडळाचे उदय जगताप तसेच श्री लक्ष्मीनृसिंह पतसंस्था बल्लारपूरचे श्रीनिवास सुंचूवार, सेवा मित्रमंडळाचे विक्रांत मोहिते आदींची मुख्य उपस्थिती होती.
साधारण 34 वर्षांपासून येथे  डाव्या विचारसरणीच्या नादी लागून युवक रक्तपात करीत आहे. युवकांनी त्यापेक्षा मुख्य प्रवाहात येऊन राष्ट्राची सेवा करावी असे अहीर म्हणाले.
गडचिरोलीच्या नक्षल बिमोडासाठी केंद्रातर्फे भरीव मतद देण्याची आपली भूमिका आहे. यासाठी रक्षा मंत्रालय पुर्ण मदत करेल आणि अधिक साधने लागली तर ती देखील दिली जातील असे ते म्हणाले.
आदर्श मित्रमंडळ आणि इतर सामाजिक संस्थांनी अग्नीपंखाचा राबविलेला हा उपक्रम अनुकरणीय आहे.  नक्षल पिडीतांच्या कुटुंबाला रोजगार निर्मिती करण्याच्या दृष्टीकोणातून दिलेली मदत अधिक मोलाची आहे असे ते म्हणाले.
नक्षलवाद ही गडचिरोलीची असणारी ओळख बदलली पाहीजे.  पोलिस दर आपले काम करीतच आहे.  नागरिकांनीही आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे असे या प्रसंगी पालकमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम म्हणाले.
सामाजिक कार्याच्या माध्यमातून गडचिरोलीची सकारात्मक ओळख निर्माण करणाऱ्या सामाजिक संस्थांचे कार्य मोलाचे आहे असेही पालकमंत्री म्हणाले.
सकारात्मक विचार घेऊन नवी पिढी समोर येत आहे आणि येथील मुले आता पुण्यात येऊन जिल्हयाची नवी ओळख घडवित आहेत.  असे आदर्श मित्र मंडळाचे उदय जगताप यांनी यावेळी सांगितले.
यावेळी खासदार अशोक नेते, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांची समयोचित भाषणे झाली. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलिस उपअधिक्षक डॉ. सागर कवडे यानी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हा माहिती अधिकारी  प्रशांत दैठणकर यानी केले. शेवटी पोलिस उपअधिक्षक (गृह) गणेश बिरादार यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन आदर्श मित्र मंडळ, सेवा मित्र मंडळ पुणे, श्रीकृष्ण मित्र मंडळ, हिंदु तरुण मंडळ कँम्प पुणे तसेच श्री लक्मी्रनृसिंह पतसंस्था बल्लारपूर आणि गडचिरोली पोलिस यांनी संयुक्तरित्या केले.

via Blogger http://ift.tt/2ejzUpt




from WordPress http://ift.tt/2eCi8wo
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.