मुंबई – माइंडसेट ट्रेनिंगच्या नावाखाली एका २१ वर्षीय तरुणीचे नग्न चित्रीकरण आणि छायाचित्रे काढून ते सामाजिक संकेतस्थळांवर ठेवण्याची (अपलोड) धमकी देत बलात्कार केल्याचा गुन्हा माय मराठी या दूरचित्रवाहिनीच्या संचालकाविरुद्ध नोंदवण्यात आला आहे. (अशांना पोलिसांनी तात्काळ अटक करून कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. स्त्रियांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना हे कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचेच लक्षण होय ! – संपादक)
१. ही तरुणी मूळची रत्नागिरी येथील रहिवासी असून नालासोपारा येथे तिच्या नातेवाइकांकडे रहाते. माय मराठी दूरचित्रवाहिनीमध्ये प्रमुख वार्ताहरची जागा रिकामी असल्याचे समजताच ती मुलाखतीसाठी तेथे गेली.
२. मुलाखतीच्या वेळी प्रतिमास ३० सहस्र वेतन, चाकरी पाहून वंदे मातरम् प्रतिष्ठानच्या वतीने एक मर्सिडीज आणि एक सदनिका देण्यात येईल, असे आमिष माय मराठी दूरचित्रवाहिनीचे संचालक आणि वंदे मातरम् प्रतिष्ठानचे प्रवक्ते आभास पाटील यांनी दाखवले.
३. त्यानंतर ती तरुणी १ डिसेंबरपासून कामावर रुजू झाली आणि माइंडसेट ट्रेनिंगच्या नावाखाली त्या तरुणीवर ६ मास अत्याचार केले, असा आरोप तिने केला आहे. पाटील यांच्या वाढत्या अत्याचाराला तिने कंटाळून २५ जुलै या दिवशी तिने नोकरी सोडली; परंतु तरीही पाटील तिला मानसिक त्रास देत होता. अखेर तरुणीने तिच्या मैत्रिणीला झालेला प्रकार सांगून गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
via Blogger http://ift.tt/2fyA8eP
from WordPress http://ift.tt/2e7jApa
via IFTTT
No comments:
Post a Comment