काश्मिरी हिंदूंच्या हक्कांसाठी २३ ऑक्टोबर या दिवशी विराट हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन
सातारा रस्ता येथे उभारण्यात आलेली कमान |
सारसबाग येथील कमानीवर लावलेले फलक |
पुणे- – काश्मिरी हिंदूंच्या हक्कांसाठी येथे २३ ऑक्टोबर या दिवशी विराट हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या धर्मसभेचा होर्डिंग्ज, फ्लेक्स आणि भित्तीपत्रके आदी माध्यमांतून मोठ्या प्रमाणावर प्रसार करण्यात येत आहे. शहराच्या विविध भागात धर्मसभेच्या कमानी, तसेच फ्लेक्स लावले जात असून काही ठिकाणी डिजिटल फलकांच्या माध्यमातूनही धर्मसभेची माहिती लोकांपर्यंत पोचवली जात आहे. विशेष म्हणजे सर्वच जणांनी राष्ट्रकार्यात योगदान म्हणून स्वखर्चाने हे फलक लावले आहेत.
पनून कश्मीर, हिंदु जनजागृती समिती, काश्मिरी हिंदू सभा पुणे, लष्कर-ए-हिंद, हिंदु एकता आंदोलन पक्ष आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने या धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीराम सेनेचे अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक, पनून कश्मीरचे अध्यक्ष डॉ. अजय च्रोंगू, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, सनातन संस्थेच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. अभय वर्तक, शिवसेना-तेलंगणचे श्री. टी. एन्. मुरारी, ओडिशा येथील भारत रक्षा मंचचे श्री. अनिल धीर आदी हिंदुत्वनिष्ठ नेते सभेला संबोधित करणार आहेत.
१. शिवसेनेच्या वतीने कात्रज येथील भारती विद्यापीठ चौकात, तसेच सारसबागेजवळ आणि सातारा रस्त्यावरील पंचमी हॉटेलजवळ १०० फूट लांब आणि १० फूट रुंद अशी धर्मसभेची कमान लावण्यात आली आहे.
२. शिवसेनेचे श्री. जयदीप पडवळ यांच्या वतीने कोथरूड येथे पौड रस्त्यावर, तसेच एम्आयटी महाविद्यालयाजवळील चौकात सभेचे होर्डिंग लावण्यात आले आहेत.
३. कोथरूडमधील आनंदनगर परिसरात धर्माभिमानी श्री. ओंकार माळवदकर यांनी, शिरवळ येथील छत्रपती शिवाजी चौकात धर्माभिमनी श्री. मयूर महांगरे यांनी, तर पुणे-सातारा रस्त्यावरील कापूरहोळ गावाजवळ धर्माभिमानी व्यावसायिक श्री. गणेश जगताप यांनी डिजिटल फलकावर सभेचे विज्ञापन दाखवण्यास प्रारंभ केला आहे.
४. सभेतील सहभाग नोंदवण्यासाठी ०२०-४९१३१३१२ या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सभेतील सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले जात आहे. सभेला अजून ३ दिवस शिल्लक असतांनाच जवळपास १ सहस्र १०० जणांनी मिस्ड कॉल देऊन काश्मिरी हिंदूंना समर्थन दिले आहे.
५. १६ ऑक्टोबरला रात्री ८ ते ९ या वेळेत चलो कश्मीर या ट्रेंडच्या माध्यमातून १३ लक्ष ५ सहस्र लोकांना सभेचे निमंत्रण देण्यात आले.
६. चारचाकी गाड्या, तसेच रिक्शा यांवर भित्तीपत्रके लावण्यात येत असून अनेक वाहनचालक उत्स्फूर्तपणे भित्तीपत्रके मागवून लावून घेत आहेत.
७. पुण्याच्या आसपास पेठ, नारायणगाव, पिंरगुट, पौड, मुळशी, भूगाव, शिरवळ आदी ४० हून अधिक गावांमध्ये धर्मजागृती सभेचा प्रसार झाल्यानंतर ग्रामस्थांनी गाड्या करून धर्मसभेला येण्याचे निश्चित केले आहे. मुळशी तालुक्यातील ट्रॅक्स, तसेच टमटम या वाहनांच्या चालकांच्या संघटनेचे अध्यक्ष श्री. शंकर येनपुरे आणि अन्य १४ वाहनचालक यांची बैठक झाली. त्या वेळी वाहनचालकांनी आम्ही प्रत्येकी किमान २ ट्रॅक्स भरून ग्रामस्थांना घेऊन सभेला उपस्थित राहू, असे सांगितले.
via Blogger http://ift.tt/2dT7Fff
from WordPress http://ift.tt/2edncvV
via IFTTT
No comments:
Post a Comment