बेंगळुरू – श्रीराम, श्रीकृष्ण आणि वाल्मीकि या पौराणिक आणि धार्मिक व्यक्ती मांसाहारी होत्या, असे विधान कर्नाटकचे मंत्री प्रमोद माधवराज यांनी येथे केले. देशातील अन्न सवयीविषयी चालू असलेल्या चर्चासत्रांना अनुसरून मंत्र्यांनी जाणीवपूर्वक हे विधान केले आहे. उडुपी येथे महर्षि वाल्मीकि जयंती महोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर मंत्रीमहोदय बोलत होते. पुराणकाळामध्ये सर्वोत्कृष्ट ध्येय साध्य करण्याच्या मार्गात आजच्याप्रमाणे जात आड येत नव्हती. रामायण लिहिणारे वाल्मीकि हे कनिष्ठ जातीतील होते, तर महाभारताचे लेखक व्यास हे एका कोळी स्त्रीचे पुत्र होते, असे वक्तव्य माधवराज यांनी केले.
via Blogger http://ift.tt/2eu9i2N
from WordPress http://ift.tt/2elH67y
via IFTTT
No comments:
Post a Comment