रणरागिणीची गोव्यातील म्हापसा येथील श्री महारुद्र संस्थानच्या अध्यक्षांकडे मागणी
रणरागिणीच्या वतीने श्री. अमर कवळेकर यांना
निवेदन देतांना १. सौ. राजश्री गडेकर आणि डावीकडून
२. सौ. शर्वाणी आगरवाडेकर, ३. सौ. शुभा सावंत
आणि ४. सौ. अंजली नायक
|
म्हापसा – मंदिराचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी तोकडे कपडे परिधान करून मंदिरात प्रवेश करण्यावर प्रतिबंध घालण्याची मागणी रणरागिणी शाखेच्या वतीने येथील श्री महारुद्र संस्थानचे (श्री मारुती मंदिर) अध्यक्ष श्री. अमर कवळेकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली. या वेळी रणरागिणीच्या शिष्टमंडळामध्ये रणरागिणीच्या सौ. राजश्री गडेकर, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. शुभा सावंत, सनातन संस्थेच्या सौ. अंजली नायक आणि सौ. शर्वाणी आगरवाडेकर यांचा समावेश होता. मंदिराचे अध्यक्ष श्री. अमर कवळेकर यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दर्शवतांना मंदिराचे पावित्र्य टिकून रहाण्यासाठी सर्वांकडून योग्य कृती होऊ दे, यासाठी देवाला सामूहिक गार्हाणे घातले.
या निवेदनात म्हटले आहे की, गोव्यातील काही मंदिरांमध्ये युवती आणि काही महिला तोकडे कपडे परिधान करून मंदिरात प्रवेश करतांना आढळतात. ही धर्महानी आहे. हे रोखण्यासाठी मंदिराच्या विश्वस्तांनी तोकडे कपडे परिधान करून मंदिरात प्रवेश करण्यावर बंदी घालून त्यासंबंधीचे फलक मंदिराच्या प्रवेशद्वारावर लावावेत. गोव्यातील म्हार्दोळ येथील श्री महालसा देवस्थान, मंगेशी येथील श्री मंगेश देवस्थान आदी ठिकाणी मंदिरात प्रवेश करणार्यांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. हा आदर्श गोव्यातील इतर मंदिरांच्या विश्वस्तांनी घ्यावा.
via Blogger http://ift.tt/2dELoUV
from WordPress http://ift.tt/2eznSHK
via IFTTT
No comments:
Post a Comment